Redmi Note 12 : 200MP स्वस्त कॅमेरा फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
शाओमीने रेडमी नोट 12 सीरीज भारतात लाँच केली आहे. या रेडमी नोट १२ अंतर्गत तीन फोन लाँच करण्यात आले आहेत. ज्यामध्ये रेडमी नोट 12, रेडमी नोट 12 प्रो आणि रेडमी नोट 12 प्रो+ भारतात लाँच करण्यात आले आहेत. रेडमी नोट 12 ची सुरुवातीची किंमत 17,999 आहे. रेडमी नोट १२ प्रो+ ची किंमत २९,९ रुपयांपासून आणि रेडमी नोट १२ प्रो ची किंमत २६,९ रुपयांपासून सुरू होते. या तिन्ही फोनला ५ जी सपोर्ट देण्यात आला आहे.
रेडमी नोट ११ प्रो+ स्मार्टफोनमध्ये इन-बॉक्स १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह २०० एमपी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. रेडमी नोट ११ प्रोमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. तर ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जात आहे. रेडमी नोट १२ स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेन्सर देण्यात येणार आहे.
रेडमी नोट लाइनअप चीनमध्ये याआधीच लाँच करण्यात आला आहे. रेडमी नोट १२ स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. रेडमी नोट १२ प्रो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० प्रोसेसर देण्यात आला आहे.
रेडमी नोट १२ ५ जी किंमत आणि ऑफर
4 जीबी+128 जी – 17,999 रुपये
6 जीबी+128 जीबी – 19,999 रुपये
तसेच आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे फोन खरेदीवर 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. फोनचा पहिला सेल ११ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. फोनला mi.com, एमआय होम स्टोअर्स, अॅमेझॉन वेबसाइटवरून खरेदी करता येईल.