May 30, 2023

बायकोच्या या ५ चुका नवऱ्याला बनवतात कंगाल, खूप मेहनत करूनही नाही भेटत यश..

पत्नीच्या हातात पतीचे नशीब असते. एक पत्नी आपल्या पतीचे नशीब पालटून त्याला श्रीमंत बनवू शकते किव्हा कंगाल बनवू शकते. चला तर पाहुयात अश्या कोणत्या 5 चुका आहेत ज्या पत्नीने केल्यास पती गरीब किव्हा कंगाल बनू शकतो. घरच्या स्त्री ला गृहलक्ष्मी म्हंटले जाते. तिला वाटले तर ती घराला स्वर्ग बनवू शकते किव्हा नरकही बनवू शकते.

म्हणतात ना प्रत्येक सफल पुरुषाच्या सफलते मागे एका स्त्री चा हात असतो. ही गोष्ट 100 टक्के खरी आहे. ज्या घरात स्त्री नसते ते घर घर नसते .प्रत्येक घराची समृद्धी स्त्री च्या हातात असते.

जोतिष शास्त्र नुसार कळत नकळत अश्या काही चुका होतात अशी काही कामे होतात ज्यामुळे तिचा पती कंगाल होतो.. मित्रानो स्त्री ने नेहमी लक्ष्यात ठेवावे,की झाडू ला कधीही लात मारू नये. किव्हा पायाने ढकलू नये. झाडू ला आपण लक्ष्मी चे प्रतीक मानतो. म्हणूनच आपण तिची पूजा लक्ष्मी पूजे ला करतो. म्हणूनच ही चूक आपल्या हातून होऊ नये याची काळजी घ्यावी.

झाडूला पाय लागण्यास लगेच पाया पडावे. काहीस्त्री याना उष्टे, खरकटे भांडे तसेच ठेवण्याची सवय असते, यामुळे ही घरात दारिद्र्य येते. म्हणूनच कधीही उष्टे,खरकटे भांडे बेसन मध्ये तसेच पडू देऊ नये. सोभाग्य स्त्री चा सर्वात मोठा दागिना आहे तिचे कुंकू,म्हणून स्त्री ने कधीही कुंकू लावताना खाली पडू देऊ नये.

तसेच आपल्या कोईलीतील कुंकू कधीही दुसऱ्याला देऊ नये. त्याबरोबरच बांगड्या,टिकल्या,जोडावी,अश्या सोभाग्याच्या वस्तू कधीही कोणालाही देऊ नयेत. असे करणे खूप अशुभ समजले जाते.

काही स्त्रियांना खूप उशिरा झोपण्याची सवय असते, परंतु त्यामुळे घरात दारिद्र्य येते. सकाळची कामे सकाळी व्हायलाच हवी. प्रत्येक काम त्या वेळेमध्ये झाले तरच त्याला महत्व असते. आपण जर उशीरा उठलो, तर सर्वच कामांना उशीर होतो. खरे तर लक्ष्मी घरात येण्याची वेळ सकाळी व संध्याकाळीच असते.

म्हणून लक्ष्मी घरात येण्यापूर्वीच आपले घर साफ व नीटनेटके असावे. नाहीतर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. या मुळे पतीला गरीबी येते. स्त्रीयांचे मन ही शांत असावे. सतत चिडचिड करणे ओरडणे अश्याने घरची शांती नष्ट होते. घरातील वातावरण बिघडते. यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते. म्हणून घरातील स्त्री नेहमी शांत असावी.