April 1, 2023

Anganwadi Bharti 2023 Maharashtra | अंगणवाडीत 20 हजार जागांसाठी मोठी नोकर भरती होणार

Anganwadi Bharti 2023 Maharashtra | अंगणवाडीत 20 हजार जागांसाठी मोठी नोकर भरती होणार

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस मिनी पदासाठी राज्यात मोठी नोकर भरती होणार आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने घोषणा करण्यात आली असून, तब्बल 20 हजार अधिक जागांसाठी भरती होणार आहे. अंगणवाडी भरती म्हटले की येथे 100 टक्के महिलांना प्राधान्य असते. म्हणजेच अंगणवाडीमध्ये महिलांची भरती केल्या जाते.

 Maharashtra Anganwadi Bharti 2023

 राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.