May 30, 2023

स्मृतीभ्रंश होण्यामागची ही 9 कारणे

धावपळ व तणावाच्या दैनंदिन आयुष्यात शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. मानसिक आरोग्याशी निगडीत अनेक आजार वयाच्या निरनिराळ्या टप्पयावर होतात व यांपैकीच एक म्हणजे स्मृतीभ्रंश होय.वयोमानानुसार वृद्ध व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येणारा हा आजार सध्या तरूणांमध्येही आढळून येत आहे. हया आजाराने व्यक्तीच्या वैयक्तिक आणि एकंदरीतच सर्वांगीण आयुष्यावर नकारात्मक होतो. आज जाणून घेऊया स्मृतीभ्रंश होण्यामागची काही कारणे:

१.योग्य आहार न घेण्यामुळे व्यक्तीला शरीराच्या वाढीसाठी आवश्यक पोषणमूल्ये मिळत नाही व परिणाम कुपोषणासारख्या समस्या निर्माण होतात. योग्य पोषणमूल्यांच्या अभावी स्मृतीभ्रंश होऊ शकतो.

२.व्यसनाधीनता व विशेषत: धुम्रपानामुळे व्यक्तीच्या बोलणे व मेंदुच्या संतुलनाशी निगडीत न्युराॅनवर परिणाम होतो. बोलण्यामध्ये असंबद्धता निर्माण होते.

३.रात्री सातत्याने जागरणे करणे ,टीव्ही मोबाईलवर रात्री जास्त वेळ घालवणे यांमुळे शरीराच्या झोपेचे चक्र बिघडून जाते. झोपेचा प्रत्यक्ष संबंध स्मृतीशी असतो.

४.पाण्याला जीवन म्हटले जाते त् अगदी तंतोतंत खरे आहे. आपण परीक्षेला किंवा बुद्धीशी निगडीत कामाला जाताना पाणी जवळ बाळगतो. डिहायड्रेशनमुळे स्मृतीभ्रंश होऊ शकतो.

५.आळशीपणा किंवा व्यायामाच्या अभावामुळे व्यक्तीच्या कल्पकतेवर व मेंदूच्या क्रियाशीलतेवर मर्यादा येतात.

६.तणावामुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर होते. तणावाला शक्यतो दूर ठेवणे हे मेमरी  शाबूत ठेवणेयासाठी आवश्यक असते.

७.सध्या तरूणपिढी मोठ्या प्रमाणात जंक फूड खाते. जंक फूड मध्ये वापरण्यात येणा-या प्रतिबंधकांमुळे स्थुलपण, संभ्रम यांसारख्या समस्या निर्माण होतात. 

८.सध्याची तरूणपिढी ईयरफोनचा वापर मोठ्या प्रमाणात करते.सतत ईयरफोन वापरल्यामुळे ब्रेन टिश्युला इजा पोहचते. अल्झायमरचा धोकाही निर्माण होता.

९.निरोगी आयुष्यासाठी दररोज ८-९ तास झोप घेणे आवश्यक असते.पुरेशी झोप न घेण्यामुळे कालांतराने व्यक्तीची काम करण्याची क्षमता कमी होते.