April 1, 2023

शाळेत येताच विद्यार्थिनी रडत-रडत अचानक पडल्या बेशुद्ध, तपास केल्यावर समजले असे भयानक सत्य…

उत्तराखंडमधील बागेश्वर इथे ज्युनियर हायस्कूलच्या काही विद्यार्थिनी शाळेत येताच अचानक रडू लागल्या आणि थोड्या वेळात बेशुद्ध झाल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून यामुळे संपूर्ण शाळेत खळबळ उडाली.

यानंतर तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनींना चक्कर येताच डॉक्टरांना फोन करण्यात आला. त्यांच्यावर उपाचर झाले.वैद्यकीय पथक तपासणीसाठी शाळेत पोहोचले. या प्रकरणाच्या चौकशीनंतर असं समोर आलं आहे की, सगळ्यांनाच हादरा बसला.

शाळेत येण्याआधी 8 विद्यार्थ्यांनी फासावर लटकलेला मृतदेह पाहिला होता, त्यामुळे ते घाबरले होते आणि यामुळे त्या बेशुद्ध झाल्याची माहिती जिल्हा मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांकडून (CMHO) देण्यात आली.बागेश्वर येथील रायखोली ज्युनिअर हायस्कूलमध्ये गुरुवारी 6 वीच्या वर्गातील 8 विद्यार्थिनी आणि दोन मुलं अचानक किंचाळून रडू लागले.

यानंतर अचानक बेशुद्ध पडल्याने गोंधळ उडाला. यानंतर शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थिनींची तातडीने काळजी घेत त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थिनींना घरी पाठवले.काही लोक या घटनेला मास हिस्टेरिया म्हणत होते. याआधीही शेजारील अल्मोडा, पिथौरागढ, चमोली या जिल्ह्यांतील सरकारी शाळांमधून अशा घटना समोर आल्या आहेत.

या घटनेनंतर डॉक्टरांच्या पथकाने दोन दिवस ज्युनिअर हायस्कूलमध्ये जाऊन समुपदेशन केल्यानंतर शाळकरी विद्यार्थिनींवर उपचार केले.या घटनेनंतर शाळेत भीतीचे वातावरण असले तरी शाळेतील शिक्षकांनी इतर मुलांना न घाबरता शाळेत येण्याच्या सूचना दिल्या.