व्हॉट्सॲपने आपली व्हॉट्सॲप पेमेंट सेवेचा लाभ घेणाऱ्या यूजर्सची संख्या वाढवण्यासाठी ग्राहकांना पहिल्या तीन व्यवहारांवर कॅशबॅक ऑफर दिली आहे. व्हॉट्सॲप यूजर्सला प्रत्येक व्यवहाराला 35 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. असा एकूण 105 रुपयांचा कॅशबॅक मिळणार असल्याचं समजतंय. व्हॉट्सॲपवरून दिवसभरात मेसेज बघता बघता हे देखील केलं म्हणजे या कॅशबॅकचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
व्हॉट्सॲपन व्हॉट्सॲप पेमेंट वापरण्यास सुरू करणाऱ्यांसाठी किंवा काही निवडक वापरकर्त्यांसाठी कॅशबॅकची ही ऑफर दिली आहे. व्हॉट्सॲप यूजर आपल्या व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट्सना कमीत कमी 1 रुपयासुद्धा पाठवू शकतात. या व्यवहाराला सुद्धा वैध व्यवहार समजले जाईल. व्हॉट्सॲप कंपनीने आपल्या पेमेंट सेवेचा प्रचार करण्यासाठी व जास्तीत जास्त यूजर्सने सेवेचा लाभ घ्यावा यासाठी हे कॅशबॅक फिचर जोडलं आहे. व्हॉट्सॲप बिझनेस अकाऊंट या ऑफरसाठी पात्र नसणार आहे.
व्हॉट्सॲप पेमेंट कसं वापराल..?
– व्हॉट्सॲप पेमेंट सेट करा आणि तुमचे बँक अकाऊंट लिंक करा
– बँक अकाऊंट लिंक केल्यावर पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
-ज्या व्हॉट्सॲप कॉन्टॅक्टला पैसे पाठवायचे आहेत ती व्यक्ती निवडा.
– आता तुम्हाला किमान 1 रुपया पेमेंट करण्यासाठी यूपीआय पिन (UPI PIN) टाका.
-पेमेंट केलं की व्हॉट्सॲपवरून काही वेळातच तुम्हाला 35 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. असे करत तुम्हाला पहिल्या तीन पेमेंटवर 105 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.
तुम्हाला जर कॅशबॅक मिळवायचा असेल तर काही नियम आहेत. जेव्हा तुम्ही पात्र ग्राहकाला पैसे पाठवत असाल, तेव्हा त्यांना ॲपमध्ये प्रचारात्मक बॅनर किंवा भेट चिन्ह दिसायला हवे. युजर्स किमान 30 दिवसांसाठी व्हॉट्सॲप वापरकर्ते असणे आवश्यक आहे, तर तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवत आहात ती व्यक्ती व्हॉट्सॲप वापरकर्ता असावी आणि त्याने भारतात व्हॉट्सॲप पेमेंटसाठी नोंदणी केली असावी. तसंच यूजर्सने व्हॉट्सॲपच्या नवीन व्हर्जनमध्ये अपडेट करायला हवे.