April 1, 2023

विवाहित प्रेयसीला भेटायला गेला तिच्या सासरी,अन मग झाले सुरू

बिहारच्या आरामध्ये एका तरूणाला बेदम मा-र-हा-ण करून त्याची ह-त्-या करण्यात आली आहे. हा तरूण त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी आला होता. तेव्हाच तरूणीच्या सासरच्या लोकांनी दोघांना सोबत बघितलं.त्यानंतर त्यांनी तरूणाला बेदम मा-र-हा-ण केली.
ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या ह-त्-येचा आरोप विवाहित प्रेयसी, तिचा पती, सासरा आणि दिरावर लागला आहे.ही घटना सोहरा गावातील आहे. घटनेची सूचना मिळताच पोलीस अधिकारी अरविंद कुमार दलबल लगेच घटनास्थळी पोहोचले. आरोपी प्रेयसी, तिचा पती आणि दिरासहीत सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.
सोबतच मृ-त-दे-ह ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. तरूणाचं नाव चंदन पांडे होतं. तो धमवल गावात राहणारा होता. तरूण यूपीच्या बनारसमध्ये खाजगी नोकरी करत होता. चंदन पांडे त्याच्याच गावात राहणाऱ्या रूबी देवीच्या प्रेमात होता. अनेक वर्षापासून त्यांचं अफेअर सुरू होतं.
रूबीचं 2018 मध्ये सोहरा गावातील एका तरूणासोबत लग्न झालं. पण चंदन आणि रूबीचं लपून भेटणं काही बंद झालं नाही. सोमवारी रात्री चंदन रूबीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला होता.रूबीच्या सांगण्यावरून तो तिच्या घरी आला होता. जेव्हा दोघेही रूममध्ये सोबत होते तेव्हाच सासरच्या लोकांनी त्यांना पाहिलं.
नंतर आरोपी रूबी देवी, तिचा पती राजू पासवान, सासरा आणि दिराला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, रूबी देवीची चौकशी करण्यात आली, पण तिने चंदनसोबत काही संबंध नसल्याचं खोटं सांगितलं.रूबी म्हणाली की, चंदन आणि तिच्या पतीमध्ये काही कारणाने वाद झाला होता.दोघांचं भांडण झालं.दरम्यान चंदनने तिच्या पतीवर धारदार हत्याराने वार केला. चंदनचा मृत्यू कसा झाला याबाबत काहीच माहीत नसल्याचं ती म्हणाली.