मानवी शरीराचा नितंब हा सेंटर पॉईंट किंवा मूलाधार आहे. त्यामुळे आपण पडल्यावर नितंबावरच पडतो. त्यामुळे निसर्गाने अशा अपघाती परिस्थितीतून सुरक्षा करण्यासाठी मानवाला जाड, मांसल, चरबीयुक्त नितम्ब दिलेले आहे. जे एखाद्या आर्मर प्रमाणे आघाताची तीव्रता कमी करण्याचे काम करते. मग महिलांना पुरुषांपेक्षा जास्त हेवी आर्मर कशासाठी बर?
तर महिलांना ह्या भागात जननेंद्रिय अवयव, गर्भाशय यासारखे नाजूक व अतिमहत्त्वाचे अवयव असतात त्यांची अशा धक्यांपासून सुरक्षा करणे जास्त महत्वाचे असते त्यामुळे महिलांना जास्त जाडीचे सुरक्षाकवच प्रदान करण्यात आले. ज्यावेळी महिला गर्भवती होते त्यावेळी तर गर्भासाठी जास्तच सुरक्षेची गरज असते त्यामुळे गर्भवती स्त्रियांचे नितम्ब इतर वेळेपेक्षा दुप्पट वाढते
डोक्यावर पडून मेंदूला इजा झाली असती किंवा पाठीवर पडल्यामुळे हृदय, यकृत किंवा फुफ्फुस डॅमेज झाले असते. म्हणजे जाड नितम्ब देऊन निसर्गाने आपले त्या भागाचे वजन वाढवलेले आहे. म्हणजे त्या भागाला सेंटर ऑफ ग्रेव्हीटी केले आहे. जेणे करून पडलो तरी वजन जास्त असल्यामुळे नितंबाचा भाग सर्वात प्रथम जमिनीला आघात करेल. त्यामुळे मेंदू, हृदयासरख्या अति नाजूक अवयवांचे संरक्षण होईल.
तर म्हणजे गर्भाचे रक्षण हा एक भाग सोडला तर प्रत्यक्ष लग्न होणे न होण्याचा नितंबाच्या वाढीशी तसा डायरेक्ट संबंध नाही. वयपरत्वे ते तर होणारच असते. त्यामुळे एखादी झिरो फिगर स्त्री दिसली तर इतर स्त्रियांनी तिचा हेवा करू नका. तिची कीव करा. व देवाचे व निसर्गाचे आभार व्यक्त करा की त्याने तुम्हाला दणकट आर्मर(कवच) दिलेले आहे.