April 1, 2023

या योजनेतून बचत गट महिलांना मिळणार 20 लाख रु कर्ज – Mahila Bachat Gat

या योजनेतून बचत गट महिलांना मिळणार 20 लाख रु कर्ज – Mahila Bachat Gat
आपल्या सरकारने राज्यातील महिलांसाठी अनेक योजनांची तरतूद केली आहे अनेक योजना महिलांसाठी राबवल्या जातात. यातील एका योजनेबद्दल आपणांस जाणून. महाराष्ट्रातील या योजनेतून महिलांना वीस लाख रुपये कर्ज मिळणार आहे चला तर जाणून घेऊया ही कोणती योजना आहे.

महाराष्ट्रातील महिलांसाठी उमेद अभियान या योजनेअंतर्गत एक योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला वैयक्तिक कारणासाठी तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वीस लाख रुपये कर्ज घेऊ शकतात.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरजू महिलांना कर्ज उपलब्ध करून देणे यासाठी ही उमेद अभियान अशी योजना राबवण्यात आली आहे. यातून गरजू महिलांना कर्ज दिले जाते तसेच ही कर्ज घेण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे.

मराठवाड्यातील पंधरा ते वीस हजार बचत गटांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. साधारणपणे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिला गटाची स्थापना केली जाते. त्यांना आता कर्ज मिळणार आहे.

या योजनेसाठी महिलांना कोणत्याही प्रकारचे तारण ठेवण्याची गरज नाही. कधी विनाकारण देखील महिलांना हे वीस लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. त्यातून त्या एखादा स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड

2)मतदान ओळखपत्र

3) बँक पासबुक

4)मोबाईल नंबर

( याच्या व्यतिरिक्त अनेक कागदपत्रे देखील लागू शकतात )

योजनेसाठी अर्ज कसा व कोठे करायच.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला तुमचे बचत गटाचे खाते ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये जाऊन संपर्क साधावा लागेल तिथेच तुम्हाला या योजनेचे संपूर्ण माहिती मिळेल.