October 2, 2022

‘या’ मुलीने स्वतःशीच केलं लग्न, भारतातील पहिलीच घटना..

जगात अनेक अजब-गजब गोष्टी घडत असतात. पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करत फॅशनपासून बरंच काही भारतात अवलंबलं जातं. आता एक अशी गोष्ट घडली आहे, जे वाचून तुम्हीही तोंडात बोटे घालाल. भारतातील एका अनेक दिवस चर्चेत असलेल्या क्षमा बिंदू (Kshama Bindu) नावाच्या मुलीने स्वतःशीच लग्न केलं आहे. मग आहे ना विशेष?

गुजरातच्या क्षमा बिंदूने बुधवारी (ता. 8 जून) लग्न केले. तिने हे लग्न कोणत्याही नवऱ्या मुलासोबत न करता स्वतःशीच लग्न केलं. यामुळे राज्यात सोडा तर देशात हा चर्चेचा विषय बनला आहे. याविषयी अधिक माहीती अशी की, क्षमा बिंदूचे ठरलेल्या वेळेच्या 3 दिवस आधीच तिचे लग्न झाले.क्षमाने स्वतःच्या अंगावर लाल कपडे परिधान केलेले पाहायला मिळाले.

जशी इतर लग्न असतात तसंच क्षमाच्या लग्नात सर्व काही त्या पद्धतीने स्वतःच लग्न केलं. कस झालं असेल हे ? असा आपल्या मनात नक्की विचार येईल. पण क्षमा अत्यंत आनंदित दिसली. लग्नादरम्यान हळदी-कुंकवाचे विधी झाले, मेहंदी झाली. क्षमाने स्वतः आपल्या भांगेत सिंदूर तर भरलं पण स्वतः मंगळसूत्र घालून तिने स्वतःशीच लग्न केलं. मग त्यावेळी तिने एकटीनेच सात फेरे देखील घेतल्याचं समजलं.

“मी शेवटी एक विवाहित स्त्री..”

लग्न आटोपलं आणि लग्नाचे विधी पूर्ण केल्यावर क्षमा म्हणाली, “मी शेवटी एक विवाहित स्त्री आहे याचा मला खूप आनंद झाला आहे”, असं ती म्हणाली. क्षमाने 11 जून रोजी तिच्या लग्नाची घोषणा केली होती. तेव्हापासून त्यांच्या घरी सतत लोकांची वर्दळ होती. याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांनी विरोध केला होता. सोबत पंडित यांनी लग्नाचे विधी करण्यासही नकार दिला होता.

क्षमाला तिचा खास दिवस खराब करायचा नव्हता. 11 जूनला क्षमाचे लग्न होणार होते, पण त्या दिवशी काही वाद होण्याची शक्यता असल्याने तिने हे लग्न लवकर करण्याचा निर्णय घेतला. 8 जून रोजी तिने स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले. त्यामुळे बुधवारीच तिने स्वत:चे लग्न लावून घेतले.

क्षमाने आधी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एका नेत्याच्या विरोधानंतर तिने घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर क्षमाने टेपवर मंत्र वाजवून लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाला क्षमाच्या काही खास मित्रांनीही हजेरी लावली होती आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. नाच-गाणी आणि आनंदाच्या वातावरणात विधी पूर्ण झाले. भारतातील अशी पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे.