October 2, 2022

मोठी बातमी : ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात पुन्हा बदल..!!

तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनवणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल केले असून सरकारने आता डीएलची प्रक्रिया खूप सोपी केली आहे. जाणून घेऊया सरकारच्या या नव्या नियमाविषयी…

काय आहे नवे नियम?

 केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO मधील चाचणीची वाट पाहावी लागणार नाही. शिवाय आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करू शकतो.

 मात्र, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे. जे अर्जदार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त करतील त्यांना या प्रमाणपत्राच्या आधारे, लायसन्स देण्यात येणार आहे.

ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलसाठी कोणते नियम?

दुचाकी, तीनचाकी व हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांजवळ किमान एक एकर जागा असणे बंधनकारक आहे. तर मध्यम आणि अवजड प्रवासी वस्तूंच्या वाहनांसाठी किंवा ट्रेलरसाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.

प्रशिक्षक 12वी उत्तीर्ण असावा तसेच त्याला 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.

– हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त 4 आठवडे असावा.

 ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम 2 टप्प्यांमध्ये विभागला जाईल.एक म्हणजे थेअरी आणि दुसरे प्रॅक्टिकल.

थेअरी टप्पा संपूर्ण अभ्यासक्रमाच्या 8 तासांचा असेल, तर यामध्ये रस्त्यावरील मार्गदर्शक सूचना समजून घेणे, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालविण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश असेल. तसंच लोकांना सामान्य रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतारावर वाहन चालवायला शिकण्यासाठी 21 तास घालवावे लागणार आहेत.