October 2, 2022

मोठा दिलासा! मंकीपॉक्स व्हायरसवर औषध सापडलं

कोरोनानंतर देशात आणि जगभरात मंकीपॉक्स नावाच्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. खूप वेगाने हा व्हायरस पसरत असल्याची माहिती समोर आली होती. हा व्हायरस थेट जिवानिशी धोकादायक नसला तरी याचा फटका मात्र शरीराला बसत होता. आधीच कोरोना त्यातच हा नवा व्हायरस समोर आल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

आता या मंकीपॉक्स वर उपचार घेणे सहज शक्य असणार आहे. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात या व्हायरसवर ठरावीक पध्दतीने औषधोपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होईल, असे सांगण्यात आले आहे. अँटीव्हायरल औषधे मंकीपॉक्स रोगातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ही औषधे लक्षणे कमी करू शकतात आणि रुग्णाला रोगातून लवकर बरे होण्यास मदत करतात. हा रिसर्च लिव्हरपूल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट, ब्रिटन येथे करण्यात आला आहे.

संशोधनाचे प्रमुख लेखक एडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘महामारीच्या या नवीन उद्रेकाने ब्रिटनमध्ये पूर्वीपेक्षा जास्त रुग्णांना प्रभावित केलं आहे, तर मंकीपॉक्स पूर्वी लोकांमध्ये वेगाने पसरत नव्हते, त्यामुळे एकूणच सध्या धोका कमी आहे.’