May 30, 2023

मिनी डाळ मिलसाठी 1.50 लाखापर्यंत अनुदान; असा करा अर्ज : Mini Dal Mill Yojana Maharashtra 2023

मिनी डाळ मिलसाठी 1.50 लाखापर्यंत अनुदान; असा करा अर्ज : Mini Dal Mill Yojana Maharashtra 2023

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व समृद्ध करण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी (MahaDBT Subsidy) पोर्टलच्या माध्यमातून विविध अशा योजना राबविल्या जातात. यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मिनी डाळ मिल अनुदान योजना होय.

मिनी डाळ मिल योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष करून महिलांना शेतीसोबत इतर पूरक व्यवसाय (Business) करून उत्पन्न मिळवता यावा, यासाठी अनुदान दिलं जातं. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत “उन्नत शेती समृद्ध शेतकरी आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियान” या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिनी दाल मिल वाटप केलं जातं.


कमी भांडवलामध्ये सर्व प्रकारच्या डाळी तयार करण्यासाठी मिनी डाळ मिल यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. शेतामधील धान्याची मळणी करून आणल्यानंतर त्याचे दाळीमध्ये रूपांतर करण्यासाठी डाळ मिल यंत्राचा वापर केला जातो. डाळ मिल उद्योग हा कमी भांडवलामध्ये चांगले पैसे कमवून देणारा व्यवसाय असून शासन यासाठी अनुदान (Subsidy) सुद्धा देत.


शेतकऱ्यांना मिनी डाळ मिलसाठी 60% व 50% अनुदान दिलं जात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला यांना 60 टक्के अनुदान देण्यात येईल, तर इतर लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येईल. अनुदानाची उच्चतम मर्यादा 1.50 लाख इतकी असेल.

डाळ मिल योजनेसाठी आवश्यक कागदपत्र (Documents)

आधारकार्ड

बँक पासबुक झेरॉक्स

जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)

जमिनीचा 7/12 व 8अ उतारा

GST बिल

दुकानदारकडील कोटेशन बिल

शेतकरी हमीपत्र

करारनामा

मिनी डाळ मिल योजनेसाठी अर्ज कसा करावा ? (Online Application)

शेतकरी महिला किंवा संस्थांना मिनी डाळ मिल योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा लागेल. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास अर्जदार तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात.


मिनी डाळ मिल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा झाल्यास अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावा लागतो. अर्ज करताना शेतकऱ्यांना खालील पद्धतीने अर्ज करावा लागेल

डाळ मिल सबसिडीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज : Government Dal Mill Subsidy Scheme

अर्जदारांनी नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन अश्या प्रकारचे तीन घटक दिसतील. त्यामधील कृषी यांत्रिकीकरण या घटकासमोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

त्यानंतर मुख्य घटक > कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य > प्रक्रिया संच > मिनी डाळ मिल > क्षमता 80 ते 120 किलो

वरीलप्रमाणे सर्व बाबी निवडल्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करून घ्यायचा आहे.

जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पहिल्यांदा अर्ज करत असाल तर 23.60 रु. इतकी ऑनलाईन पेमेंट तुम्हाला अर्जासाठी करावी लागेल, जर यापूर्वी तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत एखाद्या घटकासाठी अर्ज केलेला असेल, तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.

अर्ज केल्यानंतर अर्जाची पावती तुम्हाला लगेच पीडीएफ स्वरूपात मिळेल.