January 27, 2023

मागेल त्याला विहीर, या योजनेत सरकार 4 लाख रू. अनुदान मिळणार!! Vihir Anudan Yojana Maharashtra 2022

आपले सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना असतात. सरकारने आता विहीर योजना आणली आहे या विहिरीसाठी शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या अनुदान मिळत आहे. आता त्यामध्ये रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी वाढ केली आहे.

योजनेअंतर्गत प्रत्येक विहिरी मागे एक लाख रुपये अनुदानात वाढ झाली आहे. साठी चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे. सध्याचा खर्च पाहता सरकारने शेतकऱ्यांना एक लाख रुपये वाढवून दिली आहे त्यामुळे सगळा खर्च देखील भरून निघतो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील त्याला विहीर या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा त्यामुळे विहिरीसाठीचे एक लाख रुपये अनुदान देखील वाढवून दिले आहे.
काय आहे मागेल त्याला विहीर योजना ?, रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी. मागेल त्याला विहीर योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत पंचायत समिती प्रशासनाला प्रस्ताव सादर करावा लागतो.
तर मिळालेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळते. मंजुरी मिळायला नंतर देखील सगळे अनुदान एकत्र खात्यात जमा होत नाही तर ते दोन ते चार टप्प्यात हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात चार लाख रुपये अनुदान म्हणून जमा केले जातात.
मागेल त्याला विहीर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम ग्रामपंचायतची संपर्क साधावा लागेल त्यानंतर ग्रामपंचायत मधील ठराव घेऊन पंचायत समिती प्रशासनाला तो ठराव दाखल करावा लागेल.
त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे मंजुरीसाठी अर्ज सादर केला जातो. जिल्हा परिषद प्रशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांला त्या विहिरींचा लाभ दिला जातो.