October 2, 2022

महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने कोणते निर्णय घेतले? पाहा!

1. इंधन दर कपात : सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केलीय. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली

2. आयात शुल्क कमी : सरकारने पोलाद आणि प्लास्टिक उद्योगासाठी प्रमुख कच्चा माल आणि इनपुटवरील आयात शुल्क कमी केले आहे. याशिवाय सरकारने सिमेंटचे दर कमी करण्याची योजना आखलीय.

3. तेल शुल्कमुक्त : सरकारने चालू आणि पुढील आर्थिक वर्षात 2 दशलक्ष टन क्रूड सोयाबीन आणि क्रूड सूर्यफूल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिलीय. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहे.

4. 200 रुपये सबसिडी : उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडीही दिलीय. याचा सुमारे नऊ कोटी लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.

5. खत अनुदान : साखर निर्यातीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सरकारने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लादलेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 1.1 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त खत अनुदानही जाहीर करण्यात आलेय.