December 6, 2022

बेरोजगार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, ‘बीएचईएल’मध्ये ‘इतक्या’ जागांसाठी बंपर भरती..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर इथे तब्बल 75 जागांसाठी नोकर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (BHEL Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

‘बीएचईएल’मध्ये ‘वेल्डर’ या पदांसाठी ही भरती होत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या नोकर भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

एकूण जागा – 75

या पदासाठी भरती – वेल्डर

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

 • इच्छूक उमेदवारांनी आयटीआय (ITI), एनटीसी (NTC) पर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.
 • उमेदवारांकडे ‘Qualified Boiler Welder’s Certificate as per Indian Boiler Regulations, 1950’ असावं.
 • उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून झालेलं असावं.
 • संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
 • तसेच ‘ARC & TIG/ GTAW welding in Pressure part joints welding’मधील अनुभव आवश्यक.
 • उमेदवारांना boiler, power cycle piping मध्ये कामाचा अनुभव हवा.
 • पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.

आवश्यक कागदपत्रं

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर) भेल, पॉवर सेक्टर वेस्टर्न रिजन, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, 345 किंग्सवे, नागपूर – 440001.