बायका बेंबी का दाखवतात? घ्या जाणून…
बायका विस्फारलेले डोळे, फेंदरलेल्या नाकपुड्या, चपला आणि ऍटीट्युड पण दाखवतात. तुम्हाला बेंबीच का हो दिसते?पुराणकाळात सगळेच बेंबी आणि स्त-न दाखवायचे. त्यामुळे पौराणिक जग हे पुढारलेले होते आणि आधुनिक जग मागासलेले झाले आहे असं बोलायला तुम्ही मोकळे
बेंबी काय स्त-न काय नितंब काय दाखवणारे वाट्टेल ते दाखवतील आणि बघणारे वाट्टेल ते बघतील. पुरुषांना जसे आपल्या पुरुष पूर्वाजांशी जोडणारे आडनाव मिरवायचे असते तसेच स्त्रियांना आपल्या स्त्री पूर्वजांशी जोडणारी नाळ त्या बेंबीतून मिरवायची असेल.पण ह्या प्रश्नात खरी पंचाईत बेंबी हा शब्द वापरल्याने नाही तर बायका हा शब्द वापरल्याने झालीय.
अचानक ह्या विषयाला स्त्रीवादी कलाटणी मिळाल्याने अशा प्रश्नांवर माझ्यासारखे रिकामटेकडे पुरुष उलटसुलट उत्तरं देऊन अन त्यावर कोराचे आडवेतिडवे नियम लागून एक तर हा प्रश्न बाद व्हायचा किंवा माझं उत्तर!असो. हा प्रश्न इंग्रजीत म्हणतात तसा rhetorical असल्याने मी त्याच पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
काय झालं आहे की स्त्रीच्या शरीराला पुरुषांनी अनादी काळापासून शृंगारिक सौंदर्याचं मापदंड बनवून टाकलंय. वाट्टेल तिथे तिच्या काळ्याभोर केसांना, मृग नयनी डोळ्यांना तसंच वक्ष, कटी, मांड्या, बेंब्या आणि इतर अवयवांना शृंगारिक चौकट लावून त्यांचं गुणगान म्हणून वस्त्रकला, शिल्पकला, चित्रकला आणि कविताकामिनी विलासित होत गेल्या.
शृंगारिक गोडवे गाऊन गाऊन स्त्रीसौदर्य ओव्हररेटेड आणि ओव्हरडन करून टाकलं.त्यामुळे जरा कुठल्या बाईने डोळे मुरकत पापण्यांची पिट पिट करत उभा कटाक्ष टाकला तर एखादा पुरुष हुरळून त्यावर नजरेचा बाण, भुवयीची तलवार, इशाऱ्याची हेडलाईट, घायाळ हरीण”, वगैरे बोलत उभ्याउभ्या हायकू करून टाकील. ती बाई मात्र त्या हुरळलेल्या बाप्याची तोंद पाहून त्याच्या बॉडी फिट शर्टाच्या पोटाशी जेमतेम तग धरून राहिलेली बटणं बघत त्याच्या फॅशन सेंसची कीव करत तिथं उभी असेल.
पुरुषाला काही फरक पडत नाही कारण पुरुष विल बी पुरुषच!म्हणून अशा मॅनली संवेदना पुरुषाच्या डोक्यातून डोकावयाला लागल्या की स्त्रीच्या वस्त्रातून सुद्धा त्या जाणवायला लागतात आणि मग ओढलेल्या ओढणीच्या मागचं कोवळं वय म्हणा की शालीन साडीच्या पदरात निस्तरलेली बेंबी…