October 2, 2022

पुण्यात २७ वर्षीय महिलेवर तब्बल ५ वर्ष बलात्कार अन् अखेर महिलेनी हिंमत करुन…

पिंपरी : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेच्या संमतीशिवाय शारीरीक संबंध करून महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार २०१६ पासुन ते १५ डिसेंबर २०२० पर्यंत शांताई पार्क थेरगाव फाटा,डांगे चौक येथे घडला.

एका २७ वर्षीय महिलेने शुक्रवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार कमलेश रामलाल फंदी(वय ३१) रा.शांताई पार्क थेरगाव फाटा,डांगे चौक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,सुरूवातीला आरोपी याने फिर्यादी यांच्याशी मैत्री केली.त्यानंतर फिरण्याच्या बाहाणा करून इच्छेविरूद्ध आरोपी राहत असलेल्या फ्लॉटवर नेले.लग्नाचे आश्वासन देऊन महिलेचे नको त्या अवस्थेतील फोटो काढले.त्यानंतर हे फोटो व्हायरल करेल असा दम आरोपीने महिलेला दिला.त्यानंतर वेळोवेळी शारीरीक संबंध ठेऊन महिलेवर अत्याचार केला,असे पिडीत महिलेने म्हटले आहे.