April 1, 2023

पुण्यात व्हिडीओ काॅलवर पोरीने काढले सगळे कपडे, सोबत पोरानेही काढले अन् कारनामाचं झाला

पुणे, 11 ऑक्टोंबर : पुण्यात हनी ट्रॅप प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी सेक्सटॉर्शनच्या प्रकरणातून एकाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यासह अन्य जिल्ह्यातही या प्रकरणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याच बोलले जात आहे.

पुण्यात ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. दरम्यान ती तरूणी सातत्याने खंडणीची मागणी करत असल्याने त्या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आत्महत्या केलेला 25 वर्षीय तरुण हा धनकवडीत रहायला होता. त्याने 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाची काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंग साइटवर एका अनोळखी तरुणीशी ओळख झाली होती. दोघांमधील संवाद वाढला. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी तिने तरुणाला दिली. त्यानंतर तरुणाने तिला ऑनलाइन पद्धतीने साडेचार हजार रुपये पाठविले होते. त्यानंतरही तरुणीने त्याला धमकावत होते.

अखेर संकेतनी तिला संदेश पाठविला की, ‘मैं सुसाईड करा रहा हूँ’. त्यावर तिने ‘करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हीडीओ व्हायरल कर रही हूँ’, अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. तरुणीच्या धमक्यांमुळे तरुणाने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद तरुणाच्या भावाने सहकारनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या व्हॉट्सअप नंबरवरून गुन्हा दाखल केला आहे. तर मुलीचा शोध लागला नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सेक्शटॉर्शनचा प्रकार सध्या वाढला असून यापासून सावधगिरी बाळगणे महत्त्वाचं आहे.