April 1, 2023

पुण्यात नग्न अवस्थेत तरुण थेट महिलेच्या शेजारी जाऊन झोपला अन् मग…

पुण्यात नग्न अवस्थेत तरुण थेट महिलेच्या शेजारी जाऊन झोपला अन् मग….

पुणे : पुण्यातील येरवडा भागात एक अत्यंत किळसवाणा प्रकार घडला आहे.एक तरुण नग्न अवस्थेत घरात शिरुन थेट महिलेच्या शेजारी जाऊन झोपला.यासंबंधी ३२ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी तातडीने विकृत आरोपीला अटकही केली आहे.अरूण लहू गालफांडे(वय २४,रा. यशवंतनगर,येरवडा) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अरूण हा रिक्षा चालक आहे.तो दिवसभर रिक्षा चालवितो.तो या परिसरात राहणारा असुन अविवाहित आहे.अरुण हा तक्रारदार महिलेच्या ओळखीतलच आहे.दरम्यान,पहाटे साडे ४ वाजण्याच्या सुमारास अरूण हा नग्न अवस्थेत तक्रारदार महिलेच्या घरात शिरुन महिलेच्या शेजारी जाऊन झोपला.तक्रारदार महिलेला अचानक जाग आल्यानंतर त्यांनी पाहिले असता त्या भीतीपोटी ओरडतच बाहेर पळत आल्या.त्यानंतर एकच गोंधळ उडाला.मात्र तोपर्यंत अरूणनी धुम ठोकली होती.

महिलेने पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पसार झालेल्या अरूणला गुरूवारी दुपारी अटक केली.त्याने दारु पिलेली होती का,याबाबत पोलीस तपास करत आहेत.यापुर्वीही त्याने अशा प्रकारचे कृत्य ३ महिलांसोबत केले आहे.आरोपी अरुण गालफांडे हा परिसरात बीभत्स अवस्थेत फिरत असल्याचे आढळुन आलं आहे.त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडुन होत आहे