October 2, 2022

नाशिकच्या २६ वर्षाच्या विवाहित महिलेचं जुळलं औरंगाबादच्या तरुणाशी अन् गर्भवती झाल्यावर…

  • औरंगाबाद : विवाहिता महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन,लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला.यानंतर महिला गर्भवती राहिली असता हॉस्पिटलमध्ये नेऊन जबदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या प्रियकरासह त्याचे वडील व हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • या प्रकरणात २६ वर्षीय पिडीत महिलेने तक्रार दिली आहे.तिचे लग्न नाशिक येथे झाले होते.लग्नानंतर तिला सहा वर्षांचा मुलगाही आहे.
  • लग्नानंतर साधारणत: ४ वर्षांनी तिचा मित्र उमेर(रा.चंपा चौक,) याने जाफिर शेर यार खान(वय २९,रा.रोहिला गल्ली) या तरुणाशी ओळख करून दिली.दोघे एकमेकांसोबत मोबाइलवरून बोलायचे.नंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

  • ही बाब महिलेच्या पतीला कळाल्यानंतर त्याने महिलेशी संबंध तोडले.यानंतर महिला शहरातच राहु लागली.जाफिर याने महिलेला सांभाळ करण्याचे आमिष दाखवुन तिला रशिदपुरा भागात घर घेऊन दिले.
  • जाफिर याच्यासोबत परस्पर संमतीने राहण्यास गेल्यानंतर विवाहिता गर्भवती झाली.गर्भपात केल्याशिवाय लग्न करणार नसल्याचे त्याने सांगितले.मात्र,विवाहितेने नकार दिला.यानंतर विवाहितेला पोटात त्रास होत असल्याने जाफिर याने डीमार्ट जवळील एका रुग्णालयात नेले.
  • या ठिकाणी डॉक्टरांनी गोळ्या दिल्या.जाफिर याने दुसऱ्या दिवशी महिलेला त्याच हॉस्पिटलमध्ये नेले.त्या ठिकाणी डॉक्टरांनी पुन्हा काही गोळ्या दिल्या.या गोळ्या घेतल्यानंतर २ तासांनी गर्भपात झाला.
  • या प्रकरणी महिलेला जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडणाऱ्या प्रियकर जाफिर खान याच्यासोबत त्याचे वडील शेर यार खान आणि संबंधित डॉक्टर यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.