April 1, 2023

नवरा घरी नसल्यावर बायका  हे काम करतात ! घ्या जाणून…

नवरा घरी नसताना बायको अश्या अनेक गोष्टी करते ज्या ती नव-याला कधीच सांगत नाही. कारण त्याची जाहिरातबाजी करणं तिला आवडत नाही. ती ते इतरांच्या आणि स्वत:च्या आनंदासाठी करते. मूल झालं असेल तर ती बायकोसोबत आईदेखील असते.

आणि मूल झालं नसेल तरी बायकोसोबत सून आणि इतर खूप काही असते. त्यामुळे त्या सर्व जबाबदा-या ती पार पाडत असते.स्वयंपाक, धुणीभांडी, घर आवरणं ही अगदी नेहमीची आणि वरवरची कामं वाटत असली तरी त्यामध्ये प्रचंड मेहनत आणि वेळ खर्ची होत असतो.
स्वयंपाक करताना ती आपल्या नव-याचा विचार करत असते की त्याला हा पदार्थ कश्यापद्धतीने बनवला तर आवडेल.मग त्यासाठी कराव्या लागणा-या लहानसहान गोष्टी ती करते.उदा. एखाद्या नव-याला कुठल्यातरी भाजीत दाण्याचा कुट आवडत असेल तर त्यासाठी सर्वप्रथम दाणे भाजून घेणं, मग त्याची सालं काढणं आणि तो कुटणं या सर्व गोष्टी येतात.

नवरा संध्याकाळी घरी आल्यावर त्याला काय खायला आवडेल आणि रात्रीच्या जेवणाला काय करायचं याची तयारी करण्याचंही काम नवरा घरी नसताना होत असतं. जेवणाव्यतिरिक्त खाल्ले जाणारे पदार्थ देखील नवरा घरी नसतानाच बनवल्या जात असतात. सणवार लक्षात ठेवून गोडधोड जेवण करण्याचं कामही बायकोच करत असते.
कपडे धुणं, भांडी घासणं, केर काढणं, लादी पुसणं ही कामदेखील दररोज करावी लागतात.भांडी घासताना ती स्वच्छच घासावी लागतात. आदल्या दिवशी मटण केलं असेल तर भांड्याचा तेलकटपणा घालवण्यातही बराच वेळ जातो. काचेची भांडी न फुटता नीट घासून ठेवणं हे सोप्प काम नाही.

जेवणानंतर शेगडी, ओटा साफ करणं, भांडी घासल्यानंतर जागच्या जागी लावणं, बेसिन धुणं हेदेखील रोज आणि वेळोवेळी करावं लागतं. किचनच्या टाईल्सवर तेलाची राप बसते, ती किमान आठवड्यातून एकदा साफ करण्याचंही काम ती करत असते.
नवरा किचनमध्ये जात नसला तरी आपलं घर स्वच्छ दिसावं, ही तिची त्यामागची भावना असते.कपडे धुवायला हल्ली वॉशिंग मशीन असते. पण त्यामध्ये कपडे लावण्याचं काम असतंच की. मशीन असली तरी काही कपडे हाताने धुवावे लागतात. ते धुवून झाले की बाथरूम साफ करणं आलं.

कपडे सुकवणे, सुकल्यावर त्याच्या नीट घड्या घालून कपाटात ठेवणे, नव-याचे कपडे इस्त्री करूणे किंवा करून आणणे, कपाटातील विस्कटलेले कपडे लावणे, बेडवरी चादर बदलणे ही कामंही नवरा नसतानाच होत असतात. टॉयलेटही दररोज साफ करावं लागतंच. नवरा घरी नसताना बायको हीकामंदेखील करते.