April 1, 2023

नवरा अन् दीरमधला फरक 1 वर्ष नववधूला समजला नाही,अन मग रोज रात्री…

जुळे असल्याचा फायदा घेत दिराने भावजयीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिसांनी दोघा जुळ्या भावांना अटक केली आहे.पाेलिसांनी सांगितले,लातूर शहरातील रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले.
लग्न झालेल्या तरुणाला जुळा भाऊ आहे. त्या दोघांमध्ये कमालीचे साम्य आहे. त्यामुळे घरात आलेल्या 20 वर्षीय नववधूला आपला नवरा आणि दीर काेणता यातील फरकच समजला नाही.जुळे असल्याचा फायदा घेत दिराने भावजयीवर अ’-त्’-या’-चार केला.
हा प्रकार तब्बल सहा महिन्यानंतर विवाहितेच्या लक्षात आला. माहेरी गेलेल्या विवाहितेला आणण्यासाठी जुळा दीर गेला असता, तिने नांदायला जाण्यास नकार दिला.दरम्यान, यावर पीडितेच्या आई-वडिलांनी नांदायला न जाण्याचे कारण विचारले असता, घडलेला प्रकार तिने कथन केला.
हा गंभीर प्रकार आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पीडित मुलीला मानसिक आधार दिला. पीडित विवाहितेने लातुरातील शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी गु’-न्हा दाखल करण्यात आला असून, पाेलिसांनी दोघा जुळ्या भावांना अटक केली आहे, असे लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी सांगितले. तपास पोलीस उपनिरीक्षक निलकांते करीत आहेत.