May 30, 2023

दहावी पास तरुणांना नोकरीची संधी, ‘एमपीएससी’तर्फे ‘या’ पदांसाठी बंपर भरती..!

तुम्हाला जर चांगलं टायपिंग येत असेल, तर तुमच्यासाठी नोकरीची चांगली संधी चालून आलीय.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी बंपर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ‘ऑनलाईन’ पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत.

एकूण जागा – 253‘या’ पदांसाठी भरती

लघुलेखक (उच्च श्रेणी) – 62

लघुलेखक (निम्न श्रेणी) – 100

लघुलेखक-टंकलेखक (मराठी) – 52

लघुलेखक (इंग्रजी) – 39

पात्रता

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेला असावा. तसेच, त्याचा टायपिंगचा वेगही चांगला असावा.

संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.

संबंधित पदभरतीच्या सर्व अटी -शर्थी पूर्ण करणं आवश्यक

वयोमर्यादा – उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावी.

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी – 394 रुपये

मागासवर्गीय वर्गासाठी – 294 रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 एप्रिल 2022

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2022

येथे करा ऑनलाईन अर्ज – https://mpsconline.gov.in/candidate