December 6, 2022

दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, ‘एअर इंडिया’मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ‘एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड’ (Air India Air Services ltd) मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.‘एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड’मध्ये होणाऱ्या या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

टर्मिनल मॅनेजर – 01

डेप्युटी टर्मिनल मॅनेजर- पॅक्स – 01

ड्युटी मॅनेजर टर्मिनल – 06

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह-टेक्निकल – 05

रॅम्प सर्विस एजंट – 12

युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 96

कस्टमर एजंट – 206

हँडीमन/ हँडीवूमन – 277

अर्जासाठी पत्ताशैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा

  • टर्मिनल मॅनेजर – पदवीधर / 20 वर्षे अनुभव, कमाल वय 55 वर्षे
  • डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – पदवीधर / 18 वर्षे अनुभव, कमाल वय 55 वर्षे
  • ड्युटी मॅनेजर टर्मिनल – पदवीधर, 16 वर्षे अनुभव, कमाल वय 55 वर्षे
  • ज्युनियर एक्झिक्युटिव्ह-टेक्निकल – 1) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी 2) हलके वाहन चालक परवाना (LMV), कमाल वय 28 वर्षांपर्यंत.
  • रॅम्प सर्विस एजंट – 1) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI / NCVT ( मोटर व्हेईकल/ ऑटो इलेक्ट्रिकल / एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर) 2) अवजड वाहन चालक परवाना (HMV), कमाल वय 28 वर्षांपर्यंत.
  • युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 1) 10 वी उत्तीर्ण, 2) अवजड वाहन चालक परवाना (HMV), कमाल वय 28 वर्षांपर्यंत.
  • कस्टमर एजंट- पदवीधर + IATA – UFTAA/ IATA – FIATA or IATA – DGR / IATA -CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर + 01 वर्ष अनुभव, कमाल वय 28 वर्षांपर्यंत
  • हँडीमन/ हँडीवूमन – 10वी उत्तीर्ण, कमाल वय 28 वर्षांपर्यंत.

अर्जासाठी पत्ता —- HRD डिपार्टमेंट, एअर इंडिया प्रिमायसेस, AI एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड न्यू टेक्निकल एरिया, GS बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, कोलकाता – 700 052 (लँडमार्क – NSCBI एअरपोर्ट / Opposite एअरपोर्ट पोस्ट ऑफिस) संपर्क – (033) 2469-5096

अर्ज शुल्क —-जनरल /ओबीसी – 500/- रुप एससी/ एसटी/ एक्स मॅन – फी नाही