Turmeric For Skin: हळदीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट गुण हे त्वचेला अधिक उजळपणा मिळवून देण्यास आणि त्वचेवरील काळे डाग काढून टाकण्यास उपयोग ठरतात. हळदीचा उपयोग त्वचा उजळविण्यासाठी करण्यात येतो. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. याचा वापर केल्याने एक्ने, सनबर्न, टॅनिंग अशा अनेक समस्यांपासून सुटका मिळते. चेहऱ्यावर अधिक उजळपणा आणण्यासाठी हळदीचा वापर करतात आणि म्हणूनच लग्नातही हळदी समारंभ हा उत्साहात पार पाडला जातो. हळदीमुळे त्वचेत तुम्हाला आश्चर्य वाटेल इतका फरक पडतो. त्यामुळे पार्लरच्या फेऱ्या मारण्यापेक्षा तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये हळदीच्या फेसपॅकचा नक्की उपयोग करून घ्या. याबाबत आम्ही आधिक माहिती घेतली आहे
दही, हळद आणि बेसनचा फेसपॅक
झोप अपूर्ण झाल्यामुळे, ताणामुळे बरेचदा डोळ्याखालील त्वचेवर काळी वर्तुळं दिसू लागतात तसंच चेहराही निस्तेज होतो. अशावेळी तुम्ही तांदळाचे पीठ आणि हळदीचा वापर करून घेऊ शकता.
- एक चमचा तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात कच्चे दूध आणि टॉमेटोचा रस मिक्स करा
- हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या आणि चेहऱ्याला लावा
- साधारण १५-२० मिनिट्सने स्वच्छ पाण्याने धुवा
तांदळाच्या पिठामुळे आणि हळदीमुळे त्वचा उजळण्यास मदत होते आणि त्वचेचे टेक्स्चर अधिक चांगले होण्यास फायदा होतो.
त्वचेमध्ये उजळपणा आणण्यासाठी तुम्ही या फेसपॅकचा वापर करू शकता. गुलाबपाणी तुमच्या चेहऱ्यावरील तजेलदारपणा राखून ठेवण्यास मदत करते आणि हळदीचे गुण चेहरा उजळविण्यास मदत करते.
- फेसपॅक बनविण्यासाठी एक चमचा हळदीच्या पावडरमध्ये एक चमचा गुलाबपाणी मिक्स करा
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा
- सुकल्यावर पाण्याने धुवा
गुलाबपाणी आणि हळदीच्या मिश्रणामुळे चेहऱ्याला अधिक मऊपणा मिळतो आणि निस्तेज चेहरा उजळविण्यास मदत मिळते.
(वाचा – चेहऱ्यावरील काळ्या डागामुळे सौंदर्यात येतेय अडचण, तर आजच करा असा आयुर्वेदिक उपाय)
- दोन चमचे हळदी पावडर घ्या आणि त्यात कच्चे दूध मिक्स करा
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण ५-१० मिनिट्स ठेवा
- हा फेसपॅक आठवड्यातून २ वेळा लावल्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा मिळू शकतो
दूध हे चेहऱ्यावरील मऊपणा राखण्यास मदत करते. तसंच कच्चे दूध चेहऱ्याला लावल्याने त्वचेवरील डाग राहात नाहीत आणि हळदीतील अँटीसेप्टिक गुण हे चेहऱ्यासाठी उत्तम ठरतात.
दही, हळद आणि बेसन हे तिन्ही पदार्थ त्वचेसाठी अत्यंत गुणकारी ठरतात. चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यासाठी आणि त्वचा अधिक मुलायम ठेवण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता.
- एका बाऊलमध्ये तुम्ही दोन चमचे बेसन आणि एक चमचा हळद पावडर घ्या
- त्यात एक चमचा दही मिक्स करून व्यवस्थित फेटून पेस्ट करा
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा
- साधारण १५ मिनिट्स तसंच ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा
याचा उपयोग तुम्ही नियमित स्किन केअर रूटीनमध्ये केल्यास त्वचेत उजळपणा दिसून येतो आणि त्वचा अधिक चांगली राहाते.