April 1, 2023

त्वचेच्या आरोग्यासाठी आणि घनदाट केसांची काळजी घेण्यासाठी 4 गोष्टींनी बनलेले हे डिटॉक्स ड्रिंक नक्की ट्राय करा

जर तुम्हाला वाढते वजन कमी करायचे असेल आणि त्याच बरोबर तुमच्या त्वचेचा पोत सुधारायचा असेल तर फक्त क्रिम आणि मास्क लावून चालणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करावे लागतील. जर तुम्ही तुमच्या आहारात डिटॉक्स वॉटरचा समावेश केलात तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. डिटॉक्स ड्रिंक्स उत्तम पचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. यासोबतच तुमची चयापचय क्रियाही चांगली होते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होते.त्वचारोग तज्ज्ञ सल्लागार डॉ. आरती यांनी Instagram वर फक्त चार घटकांचा समावेश असलेले साधे डिटॉक्स पेय शेअर केले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

डिटॉक्स ड्रिंक हे भाज्या, फळे आणि स्वयंपाकघरात असलेल्या काही मसाल्यांच्या मदतीने तयार केलेले पेय आहे. हे प्यायल्याने शरीरातील घाण साफ होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे प्यायल्याने वजन कमी होते. त्याच प्रमाणे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. (वाचा :- मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली… )

  • साहित्य
  • ग्रीन अ‍ॅपल
  • काकाडी
  • सेलेरी
  • आले

कृती : चारही साहित्य चिरून ब्लेंडरमध्ये ठेवा. ते एका काचेच्यामध्ये घाला आणि सेवन करा.

(वाचा :- तुमच्या ‘या’ एका चुकीमुळे वाढू शकतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आजच सोडून द्या ही वाईट सवय)