December 6, 2022

तुम्हाला निळ्या रंगाचं आधार कार्ड माहीती आहे का? कोणासाठी आणि का काढलं जातं, घ्या जाणून..

देशात गेल्या काही वर्षांपासून आधार कार्ड चा वापर वाढत चालला आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला शासनानं आधार कार्डचा वापर अनेक ठिकाणी करायला लावत आहे. आधार कार्डमुळे (Aadhaar Card) नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासही मदत मिळते.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छतो की, पांढऱ्या कागदावर काळ्या रंगात आधार कार्ड छापलेले असतात. पण जेव्हा हे आधार कार्ड मुलांसाठी बनवले जाते तेव्हा त्याचा रंग बदलतो. आधार कार्ड UIDAI कडून मुलांसाठी जारी केले जाते तेव्हा त्याचा रंग निळा असतो. अशा निळ्या रंगाच्या आधार कार्डला ‘बाल आधार’ असेही म्हणतात.

सरकारकडून म्हणजेच UIDAI कडून निळ्या रंगाचे 12 अंकी आधार 5 वर्षे वयाच्या मुलांसाठी किंवा 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बनवले जाते. 5 वर्षांनी ते आधार अवैध होते आणि त्यानंतर ते पुन्हा अद्ययावत करावे लागते. जर 5 वर्षांनंतर ते अद्ययावत नाही केले नाही तर ते कार्ड निष्क्रिय होते, म्हणजेच तुम्हाला त्याचा काहीही वापर करता येत नाही.

तुमच्या मुलांचे आधार कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घराजवळील आधार केंद्रावर जावे लागेल. निळ्या आधारमध्ये (Blue Aadhar Card) बायोमेट्रिक माहिती आवश्यक नाही, नवजात बालकाचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने एक फोटो क्लिक करून ते काढले जाईल. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर एक मेसेज येईल. व्हेरिफिकेशनच्या 60 दिवसांच्या आधी तुमच्या मुलाला ब्लू आधार कार्ड जारी केले जईल.

जर तुम्हाला आधार कार्ड काढायचे असेल तर ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी, तुम्हाला UIDAI वेबसाईट वर जावं लागेल. https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx ला भेट द्यावी लागेल. मग लोकेशन कोणते आहे ते भरा आणि Proceed to Book an appointment वर क्लिक करा.