May 28, 2023

खेडेगावातील वयस्कर जोडपे हॉ’स्पिटलमध्ये ऍडमिट होते.. पुढे त्या हॉ’स्पिटलमध्ये डॉ’क्टरांनी ..

खेडेगावातील वयस्कर जोडपे हॉ’स्पिटलमध्ये ऍडमिट होते.. पुढे त्या हॉ’स्पिटलमध्ये डॉ’क्टरांनी ..

रात्रभर एका अजोबांसाठी मला कॉल येत होते. त्यांच्या हृदयाची गती कमी जास्त होत होती, ठोके देखील अनियमित होत होती. हृदय गती अनियमित असली की हृदयातच र’क्ताच्या गाठी तयार तयार होतात अशीच एक गाठ मेंदू पर्यंत जाऊन त्या आजोबांना अर्धांग वायूचा झ’टका आला होता. पण माझ्या रागाचे कारण मात्र वेगळे होते, त्या सकाळी घरात खूप वाद-विवाद झाले होते,

उगाच आरडा ओरडा केला तर्क शून्य वाद घातला की मला संताप आवरत नाही. त्यानंतर मी एक गोष्ट शिकलो तर्क शून्य व्यक्तीशी वाद घालून उपयोग नसतो, वेळ वाया जातो. शांत पणाने मुद्दा मांडून वाद मिटवणयासाठी मी प्रयत्न करतो. आरडा-ओरडा फार वाढल्याने मी नष्ट न करताच बाहेर पडलो. आपण घाईत असलो की नेमाक ट्रॅफिक लागत त्यात आमचं तपासणीत मशीन आज बंद पडल होत,

दहा बारा लाखांचा फटका, सिग्नल आल्यावर फोन चे मेसेज पाहिले तर घराचे हफ्ते, फोन बिल, कर्जाच्या नोटिसा पाहून लगेच फोन बंद केला. हॉस्पिटलच्या दारात येताच पंधरा दिवसापूर्वी कोमात असलेला तो मुलगा आज घरी चालला होता तो आणि त्याचे नातेवाईक समोरच उभे होते आणि येवढे बिल आम्ही गरीब लोक कशी भरणार अश्या धमकी वजा आवाजात विनंती करत होते.

त्यांना आमच्या समाज सेवकाकडे पाठऊन मी बॅग ठेवली आणि रागा रागातच आय. सी. यू मध्ये शिरलो होतो. नऊवदीतले ते आजोबा शांत झोपले होते. मी हार्ट मॉनिटर कडे पाहिलं त्यांची हृदय गती नियमित झाली होती. माझी धड-धड कमी झाली, त्यांना तपासायला सुरुवात केली तेवढ्यात शेजारच्या बाकावर झोपलेल्या त्यांच्या पत्नी लगबगीने उठल्या ऐंशितील त्या अजिबईंच्या त्या गोऱ्यापान,
सुसंस्कृत चेहऱ्यावर लहानस हसू उमटलं. हात जोडून त्या म्हणाल्या नमस्कार डॉक्टर! ” आज सकाळी हे जरा तरतरीत दिसले, बर वाटतय म्हणाले आणि थोडा चहा सुद्धा पिला. पण अजून उजव्या हातात अशक्तपणा आहे.” अतिशय साठी ठिगळ लावलेली साडी, काळ्या मण्यांच बीन सोन्याचं मंगळसूत्र, फाटक्या चपला, सुरकुतलेला चेहरा आणि डोळ्यातलं पाणी त्यांची परिस्तिथी कळायला पुरेस होत.

वयामुळे थोडीशी वाकलेली ती माऊली पुढे बोलली, “डॉ’क्टर आमच वय खूप आहे, पण आम्ही दोघच आहोत एकमेकांना, चांगल्यात चांगली औ-षध द्या त्यांना पैश्याची व्यवस्था करेन मी, लवकर त्यांना बर करा”. तुम्ही आमच्यासाठी देवासारखेच आहात तुमच्या पाया पडते असे म्हणत खाली वाकल्या आणि माझ्या पायाला त्यांनी हात लावला. दचकून मी मागे सरकलो,

भानावर येत मी त्यांचा हात हातात धरला आणि त्यांना धीर दिला. आजीबाईनी आजोबांना हात लाऊन जाग केलं. दोन दिवसांपूर्वी माझी आणि त्यांची काही ओळख नव्हती पण आज माझ्यापेक्षा मोठ असलेलं ते जोडपं मला हात जोडून नमस्कार करत होत. माझ्यावर विश्वास ठेऊन मी सांगेन त्या पद्धतीने उपचार करण्यास तयार होत.

खरंतर पेशंट सिरीयस असताना अनेक शंका कुशंका मनात येतात पण त्याचा राग डॉ’क्टरवर काढला जातो. मी फोन बंद केला. कुठलाही रु’ग्ण दवाखा’न्यात येताना एक चांगला प्रसन्न हसरा मदातशिर डॉ’क्टर भेटेल या अपेक्षेने येतो. डॉ’क्टरांना देखील खाजगी समस्या असतात यात त्या बिचाऱ्या रु’ग्णाचा काही दोष नसतो. चिडचिडा डॉ’क्टर भेटला तर आधीच त्रस्त असलेले रु’ग्ण अधिकच खजील होतात.

पण या आजीबाईच्या श्रद्धेमुळे मला नवीन एक गोष्ट शिकायला मिळाली होती. रागावर आणि भावनांवर नियंत्रण हा प्रत्येक डॉ’क्टरमध्ये आवश्यक असलेला गुण आहे. वर्षानुवर्ष एक चांगला डॉक्टर होण्याचा प्रयत्न केल्या नंतर समाधान मिळते ते रु’ग्णाच्या श्रद्धेतून. मी त्या आजीबाई ना सांगितलं की, काहीही लागलं तरी नर्स ना सांगा ते मला फोन करतील.

त्यांच्या फाईल वर “नो चार्जेस फॉर मी” असे लिहून तिथून निघालो. माझा राग आता पळाला होता. सकाळ पासूनच्या सगळ्या अडचणी आता लहान वाटू लागल्या होत्या. त्रस्त असलेल्या रु’ग्णांना प्रसन्न चेहऱ्याने भेटायला आता मी तयार होतो. चांगल्या इलाज साठी रु’ग्ण डॉ’क्टरांवर नाही तर कोणावर विश्वास ठेवणार ? एक गोष्ट मात्र खरी आहे की,

जो रु’ग्ण डॉ’क्टरांवर विश्वास ठेवतो त्या रु’ग्णासाठी तो डॉ’क्टर नेहमी पेक्षा जास्त मेहनत करतो. दोन दिवसांनी त्या आजोबांना डिस्चार्ज मिळाला त्या आजीबाई नी माझ्या हातात एक डबा दिला आणि म्हणाल्या की, आज घरी जाऊन माझ्या हाताने तुमच्यासाठी पुरण पोळ्या बनवल्या आहेत नक्की खा. आमच्या ह्यांना देखील पुरण पोळी खूप आवडते, घरी नेऊन खायला घालते.