May 30, 2023
ringing-bells-freedom-251

कसा झाला २५१ रुपयात मिळणाऱ्या फ्रीडम २५१ स्मार्ट फोनचा घोटाळा ?

सध्या स्मार्ट फोनच मार्केट चीनने काबिज केल असून सगळीकडे या फोनच्या खरेदीचा धुमधडाका सुरू आहे. लेटेस्ट फिचर , कॅमेरा, स्पिकर यामुळे हे फोन लोकप्रिय आहेत. साधारण चार वर्षांपूर्वी २०१६ साली मार्केटमध्ये २५१ रुपयात फ्रीडम २५१ नावाचा स्मार्ट फोन या बातमीने धूम माजवली होती.

नोएडा सेक्टर ६३ येथील ‘रिंगींग बेल्स’ या कंपनीने ही घोषणा केली होती. या फोनसाठी ऑनलाईन बुकींग ठेवण्यात आल होत. या बुकींग वेबसाईट ला एवढ ट्रॅफिक होत की, वेबसाईट वारंवार क्रॅश होत होती. परिणामी लोकांनी व डिस्ट्रिब्युटर्सनी कंपनी कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली.

या मानसिकतेचा फायदा कंपनीने घेतला.

कंपनीचा बोगसपणां
आला बाहेर

सगळ काही सुरळीत चालू आहे अस वाटत असतानाच कंपनीवर फसवणुकीचे आरोप सुरू झाले. कंपनीला ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर पैसे अकौंटमधून जात होते परंतु त्याची रिसीट मिळत नव्हती. याच दरम्यान कंपनी बोगस असल्याची तक्रार ग्राहक मंचात केली गेली. कंपनीने यावर प्रतिवाद करताना कंपनीकडे २० लाखापेक्षा जास्त मोबाईल बुकींग झाले असून लवकरच स्वस्त स्मार्ट टिव्ही लाँच करण्यात येणार असल्याच सांगीतल.

कंपनीने दावा केला की, बुकींग केलेल्यांना जून २०१६ पर्यंत मोबाईल पोहोचवण्यात येतील. परंतु वाढता गोंधळ बघून कंपनीने पैसे परत करण्याच ठरवल. या सर्व अंदाधुंदीमुळे काही जणांनी भाजपचे नेते श्री किरीट सोमय्या यांच्याकडे कंपनीची तक्रार केली. परिणामी रिंगींग बेल्स’ या कंपनीचे डायरेक्टर मोहित गोयल व अशोक चढ्ढा यांच्याविरुद्ध नोएडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार नोंदवली गेली. अटक टाळण्यासाठी या दोघांनी हाय कोर्टात धाव घेतली हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या दोघांसह इतर डायरेक्टरांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले होते.

पलायन
या सगळ्या गोंधळामुळे कंपनीने कार्यालय नोएडातून शिफ्ट करण्याचे ठरवले. तसेच कोर्टाला लोकांचे पैसे परत केल्याची ग्वाही दिली. दरम्यान मोहित गोयलने कंपनीचे एम डी पद सोडत कंपनी भावाला सोपवली. क्राईम ब्रँचने कंपनीला क्लीन चीट दिली. परंतु २३ फेब्रुवारी २०१७ साली गाझियाबाद पोलिसांनी मोहित गोयलला परत फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. थोडक्यात रिंगींग बेल्सच्या २५१ रुपयांच्या स्मार्ट फोनची रिंग वाजली नाही. ती अखेर गाजराची पुंगी ठरली.