October 2, 2022

आता “ही’ कंपनी देणार 75 रुपयांमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा प्लॅन देण्याची स्पर्धा सुरु आहे. कंपन्यातील या स्पर्धांमुळे मात्र ग्राहकाला याचा चांगलाच फायदा होत आहे. ग्राहकांना त्यामुळे स्वस्त प्लॅनचे पर्याय मिळत आहेत. जिओच्या ग्राहकांसाठी आता एक फायद्याची बातमी आहे. जिओने आता एक असा प्लॅन आणला आहे, जो खूपच फायदेशीर आहे. यामध्ये केवळ 75 रुपयांमध्ये आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. आज पॉकेटफ्रेंडली प्लॅनविषयी जाणून घेऊया…

जिओच्या या प्लॅन मध्ये काय काय :-

रिलायंस जियोने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त असा एक प्लॅन आणला आहे. यात केवळ 75 रुपयांमध्ये जास्त डेटा मिळू शकेल. जिओ. कॉमवरील माहितीनुसार 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंगपासून अनेक फायदे देण्यात आले आहेत.

या प्लॅनची वॅलिडीटी 23 दिवसांची असून हा प्लॅन फक्त 75 रुपयांमध्ये ग्राहकाला 2.5 GB डेटा वापरण्यास देतो. सोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना जियो म्युझिक, मूव्ही, जियो सिनेमा तसेच जियो सावन यासारख्या ॲप्सचा वापर करता येईल, याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 एसएमएसही मिळणार आहेत