October 2, 2022

आता रेल्वेत निवांत झोपा, प्रवाशांसाठी रेल्वेकडून खास सुविधा..!

अनेक वेळा ट्रेनमध्ये लोकांना झोप येते नि त्यामुळे स्टेशन चुकते. या समस्येवर मात करण्यासाठी रेल्वेने प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू केलीय. ‘डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म’ असं या रेल्वेच्या विशेष सेवेचे नाव आहे. या सुविधेमुळे तुम्ही रेल्वेत आरामात झोपू शकता. कारण, स्टेशन येण्याआधीच तुम्हाला रेल्वेकडूनच अलर्ट मिळणार आहे.

स्टेशन येण्याआधीच 20 मिनिटं रेल्वे तुम्हाला जागं करणार आहे. त्यामुळे स्टेशन चुकण्याची भीती राहणार नाही.. कोणतेही रेल्वे स्टेशन येण्याआधी अलार्मद्वारे त्याची माहिती दिली जाणार आहे. रेल्वेत मस्त झोप काढून तुम्ही आरामात तुमच्या स्टेशनवरही उतरु शकता.

असा घ्या सेवेचा लाभ..
कोणताही प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतो. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. रेल्वेकडून या सेवेसाठी 3 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तुम्ही ही सेवा घेतल्यास 20 मिनिटे आधी तुम्हाला फोन करून रेल्वे अलर्ट देणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्टेशनवर उतरण्यास मदत होईल व स्टेशन चुकणार नाही.

रेल्वेच्या या ‘डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म’ सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना ‘आयआरसीटीसी’ (IRCTC)चा हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करावा लागेल. कॉल आल्यावर तुमची भाषा निवडा व ‘डेस्टिनेशन अलर्ट’साठी आधी 7 आणि नंतर 2 नंबर डायल करावा लागेल. नंतर प्रवाशांकडून 10 अंकी ‘पीएनआर’ क्रमांक विचारला जाईल.