May 30, 2023

युवराज सिंहच्या ‘या’ खेळीचे आजही लाखो दिवाने

भारताचा माजी फलंदाज आणि एकेकाळी भारताचा आधारस्तंभ असलेल्या युवराज सिंह याचा आज वाढदिवस. जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतलेल्या युवराज सिंह याचा आज वाढदिवस. आपल्या कारकिर्दीत अनेक चढाव उतार बघितलेल्या या खेळाडूने नेहमीच भारतीय संघासाठी संकटमोचकाची भूमिका पार पाडली आहे.

yuvraj and flintop
yuvraj and flintop

युवराज सिंह याने आपल्या कारकिर्दीत केवळ फलंदाजीनेच नव्हे तर गोलंदाजीच्या बळावर देखील भारतीय संघाला अनेकवेळा विजय मिळवून दिला आहे. त्याने भारतीय संघासाठी तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळले असून त्याच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अनेक शानदार खेळी केल्या आहेत.

मात्र २००७ मधील टी-२० वर्ल्डकपमध्ये ठोकलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे आणि सलग सहा षटकारांमुळे तो नेमही चर्चेत असतो. वर्ल्डकपमधील या सामन्यात युवराज सिंह याने इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड याला सहा षटकार मारत हर्षल गिब्स नंतर सहा षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला.

एका षटकात सहा षटकार
इंग्लंडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या या सामन्यात १८ व्या षटकात इंग्लंडच्या फ्लिंटॉफने युवराजला डिवचले. मात्र याचा राग युवराजने ब्रॉडवर काढत त्याची गोलंदाजी फोडून काढली. १९ व्या षटकात युवराजने सर्व चेंडूंवर षटकार खेचत ३६धावा वसूल केल्या.

१२ चेंडूंमध्ये अर्धशतक : आजपर्यंत वर्ल्डरेकोर्ड
यावेळी युवराजने धडाकेबाज खेळी करत केवळ १२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात युवराजने १६ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या होत्या. यामध्ये ७ षटकार आणि चौकारांचा समावेश होता. आजपर्यंत हा वर्ल्डरेकोर्ड असून कुणालाही इतक्या कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावता आलेलं नाही.

त्याचबरोबर युवराजने २०११ च्या वर्ल्डकप स्पर्धेत देखील भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. या स्पर्धेत एका गंभीर आजाराशी झुंजत असताना देखील त्याने आपल्या शानदार कामगिरीच्या बळावर मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्याला BEING MAHARASHTRIAN च्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.