राज्यात सध्या सत्तास्थापनेचा संघर्ष सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीने केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. या याचिकेवर निर्णय देताना आज सुप्रीम कोर्टाने भाजपला 27 नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
अजित पवार यांच्या बंडखोरीच्या बळावर भाजपने सत्तास्थापन केली. मात्र त्यानंतर महाविकासआघाडीने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
काय म्हटले कोर्टाने ?
- महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी
- उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश
- गुप्त मतदान नको
- खुल्या पद्धतीने मतदान होणार
- बहुमत चाचणीचं लाईव्ह रेकॉर्डिंग होणार