January 26, 2023
Ajit Pawar

अजित पवार भाजपच्या वाटेवर?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून भाजपने तात्काळ आपल्या कोअर कमिटीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत उद्या होणाऱ्या बहुमताच्या चाचणीवर चर्चा होणार असून आमदारांची जुळवाजुळव देखील कशाप्रकारे करता येईल यावर चर्चा होणार आहे.

मात्र अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार हेदेखील सामील झाले आलेत. त्यामुळे आता अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सुप्रीम कोर्टाने भाजपला उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले असून त्याआधी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु असून सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत होती. मात्र आता त्यानंतर अजित पवार हे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहिले असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.

दरम्यान, आज सकाळी अजित पवार हे शरद पवार यांना भेटल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकासआघाडीला हा धक्का मानला जात आहे.