December 5, 2022

या मुस्लिम देशाच्या नोटांवर विराजमान आहेत गणपती..

बाजारात आपल्याला लक्ष्मी, गणपती यांची नाणी आणि नोटा पाहायला मिळतात मात्र कधी तुम्ही खऱ्या चलनावर देवांचे चित्र बघितले आहेत का ? कदाचित नाहीचं.

आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल माहिती देणार आहोत की ज्यांच्या नोटांवर गणपतीचे चित्र आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कोणता हिंदू देश नसून हा एक मुस्लिम देश आहे. तुम्हाला जाणून नवल वाटेल कि हा जगातील सर्वांत जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया देश आहे. चला तर जाणून घेऊया का यांच्या नोटांवर गणपती स्थापित आहे.

येथील 87.5% लोकसंख्या इस्लाम धर्माला मानतात. इंडोनेशियाच्या 20000 च्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे. इथे केवळ 3% हिंदू लोकसंख्या असून तिथे हे चित्र आहे आणि याचे वेगवेगळे कारणही सांगितले जातात.

पण इथे एक प्रश्न हा उपस्थित होतो की फक्त 20 हजारांच्या नोटांवरच हा फोटो का त्यावर सांगण्यात येत कि काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था खूप मोठ्या संकटात होती, तेथील राष्ट्रीय आर्थिक चिंतकानी खूप विचार करून वीस हजाराची एक नोट जारी केली ज्यावर गणपतीचे चित्र छापण्यात आले.

लोकांचे असे मत आहे की याच कारणामुळे तेथील अर्थव्यवस्था मजबूत आहे. तसेच बहुतांश लोकांचं हे म्हणणं आहे की इंडोनेशियामध्ये गणपतीला शिक्षेचा प्रतीक मानलं जातं आणि यामुळेच तेथील नोटांवर त्त्यांना खास जागा देण्यात आली आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की गणपतीचं नव्हे तर इंडोनेशियन आर्मीचे मेस्कॉट हनुमानजी आहे आणि तेथील एका फेमस टुरिस्ट डेस्टिनेशनवर अर्जुन आणि श्री मूर्ती आहे. इंडोनेशियासारख्या देशात हिंदुस्थानी संस्कृतीची छाप पाहणे आणि मिळणे हि आपल्या सर्वांसाठी गर्वांची बाब आहे.