January 27, 2023

…म्हणून प्रत्येक गावाच्या शेवटी ‘ बुद्रुक ‘ आणि ‘ खुर्द ‘ लावल्या जाते.जाणून घ्या सविस्तर …

महाराष्ट्रामध्ये अशी अनेक गावे आणि शहर देखील आहेत जिथे आजही गावातील परिसरांना बुद्रुक आणि खुर्द असे पुढे लावले जाते . आज या नावांची आपल्याला एव्हडी सवय झाली आहे कि हे शब्द नक्की काय अर्थाने आणि का वापरले जातात याचा विचार देखील आपण करत नाही . परंतु या शब्दांनाही इतिहास आहे. अगदी सामान्य असा असला तरी माहित असायलाच हवा असा आहे . म्हणूनच या लेखातून आज आपण हे जाणून घेणार आहोत .

आपल्या आसपास एका तरी परिसरास बुद्रुक आणि खुर्द हे पुढे जोडले असेंन , उदाहरणार्थ पिंपळगाव बुद्रुक – पिंपळगाव खुर्द , हिंगणे बुद्रुक – हिंगणे खुर्द आणि असे अनेक उदाहरणे आहेत . तर मग हे शब्द नक्की काय अर्थ घेऊन येतात हे प्रथम आपण पाहुयात …

अगदी सामान्य भाषेत बुद्रुक आणि खुर्द या शब्दांचा अर्थ जाऊन घ्यायचा झाला , तर याचा अर्थ होतो मोठे आणि लहान . बुद्रुक हा बुजुर्ग या शब्दाचा अपभ्रंश आहे . अर्थात गावाच्या वयाचा नाही तर आकारमानाने लहान आणि मोठे असे याचे विभाजन केले गेले आहे . गावातून वाहणाऱ्या नदीमुळे गावाचे ढोबळ मानाने विभाजन व्हायचे . यामध्ये गावाचा जो भाग आकारमानाने मोठा तो ‘ बुजुर्ग ‘ म्हणजेच आता ‘ बुद्रुक ‘  म्हणून उच्चारला जातो . आणि लहान भाग हा ‘ खुर्द ‘ म्ह्णून उच्चारला जातो .

आदिलशाही ,कुतुबशाही व मोघल यांच्या अमलात असलेल्या प्रदेशात बुद्रुक व खुर्द हे शब्द वापरले जायचे. हेच आहे या शब्दांचे उगमस्थान . मराठी , उर्दू , फारसी मिश्रित भाषेतून या शब्दांचा उगम झाला . आणि मोघल सत्तेपासून या शब्दांचा वापर होतो आहे .