मराठी मातीत जन्मलेल्या कोणत्याही मर्दमराठ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की स्फुरण चढते. शिवाजी महाराजांच्या चरित्राची अक्षरश: दैवत मानून पारायणे केली जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीची नोंद आपल्याला तत्कालीन पुस्तके, प्रवासनोंदी व चरित्रांमध्ये मिळते.
छत्रपती शिवरायांसारखा शूर लढवय्या ज्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले ते शाकाहरी होते की मांसाहारी होते हा प्रश्न ब-याचजणांना पडतो. शिवाजी महाराज हे मिताहारी म्हणजेच शाकाहारी होते असा संदर्भ त्यांचे समकालीन कवी परमानंद यांच्या “श्री शिवभारत “या चरित्रात मिळतो.
आपल्या स्वराज्याच्या ध्येयाला गाठण्यासाठी अहोरात्र झटणा-या मावळ्यांनाही शाकाहार घेणे सक्तीचे होते. शिवरायंच्या गडकिल्ल्यांवर मांसाहार करण्यास प्रतिबंध होता. इतकेच नव्हे तर गडांवरील मुदपाकखान्यामध्ये मांसाहार बनवणेही निषिद्ध होते.
अशावेळी परदेशी दूत किंवा प्रवाश्यांसाठी मांसाहार हा गडाच्या बाहेरून आणला जात असे. थाॅमस निकोलस आणि हेन्री आक्सिनेंन हे विदेशी अधिकारी शिवरायांच्या राज्यभिषेकाला हजर होते. त्यांनीही शिवरायांच्या राज्यभिषेकाच्या वर्णनामध्ये त्या समारंभामध्ये केवळ शाकाहारी भोजन असल्याचे वर्णन केले आहे.