March 16, 2023

इंदुरीकर महाराज यांच्या बद्दल माहित नसलेल्या गोष्टी

“पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?”

“पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे.”

“गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या.”

अशाप्रकारची अनेक वाक्य हे तुम्हाला सोशल मीडियावर किंवा युट्युबवर ऐकायला मिळत असतात. वाक्ये आहेत कीर्तनकार जेष्ठ समाजसुधारक श्री. महाराज देशमुख

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची खुप मोठी देणगी लाभलेली आहे .अनेक साधु-संतानी आपल्या महाराष्ट्रच्या भुमीसाठी खुप मोलाचे योगदान दिलेले आपण पाहिलेले आहे. त्यांमध्ये संत तुकाराम ,संत नामदेव ,संत गोरा कुंभार ,संत मुक्ताबाई ,संत गाडगेबाबा असे अनेक संत आहेत . अशाच महाराष्ट्रामध्ये आज देखील अनेक कीर्तनकार कीर्तनामार्फत समाजाचे प्रबोधनाचे कार्य अविरतपणे चालु आहे . त्यातच महाराष्ट्रातील अशाच एका सामाजिक प्रबोधनाची कीर्तने करणाऱ्या एका कीर्तनकाराबदल आपण आज माहिती घेणार आहोत . महाराष्ट्रामध्ये अल्पवधीत लोकप्रिय झालेल्या ह . भ . प . निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज अशी ओळख असलेल्यां इंदुरीकर महाराजांबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत .

महाराष्ट्रामध्ये अशी एक हि व्यक्ती सापडणार नाही जी इंदुरीकर महाराजांबद्दल माहिती नाही अशी मिळणार नाही . लहान पासून मोठया अश्या सर्व व्यक्तीवर इंदुरीकर महाराजांचा प्रभाव दिसुन येत असतो . सोशल मिडीयावर अनेक लोक इंदुरीकर महाराजांबदल त्यांचे विडीओ , त्यांचे डायलॉग अनेक लोक टिक- ‌टाॅक आपण खुप मोठया प्रमाणावर पाहू शकतो .त्यामुळे तरुणांचे मोठया प्रमाणावर आकर्षण म्हणुन त्यांच्याकडे पहिले जात आहे .इंदुरीकर महाराजांची खासियत म्हणजे समाजात चालु असलेल्या घटनावर ते कीर्तनातून चांगलीच टीका करता .त्याचे भविष्यात होऊ शकतील असे परिणाम देखील ते विषद करता .

इंदुरीकर महाराज अल्पपरिचय : इंदुरीकर महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हातील इंदुरी या गावी झाला . शेतकरी घरात जन्मलेल्या इंदुरीकर महाराजांवर घरातच वारकरी संप्रदायचा वारसा असल्याने बाळकडू त्यांना घरातुनच मिळाले . इंदुरीकर महाराजांचे शिक्षण हे B.sc. B.Ed इथं पर्यंत झालेले आहे . खुप मोठया प्रमाणावर इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाची मागणी सर्व महाराष्ट्रातुन होत असते . त्यांच्या कीर्तनाच्या तारखा देखील एखादया अभिनेत्या प्रमाणे मिळवणे खुप अवघड आहे . . इंदुरीकर महाराजांच्या पत्नी देखील महाराजांप्रमाणे कीर्तन करता .अनेक पुरस्कारांनी इंदुरीकर महाराजांना सन्मानित करण्यात आलेले आहेत .

इंदुरीकर महाराज कीर्तन शैली : गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यांच्या प्रमाणे समाज प्रबोधन करणाऱ्या प्रबोधन म्हणुन इंदुरीकर महाराज सध्या लोकप्रिय होत आहेत. कीर्तनामध्ये विनोद निर्मिती करून त्यातुन समाजातील वाईट प्रथांवर ते अलगत टीका करता. इंदुरीकर महाराजांवर काही लोकांकडुन मोठया प्रमाणावर टीका देखील होत असते. ते कीर्तनाचे मानधन खुप मोठया प्रमाणावर घेतात अशी टीका होते .पण त्या गोष्टींवर ते कधीच लक्ष देत नाहीत त्यांचे कार्य ते चालुच ठेवतात . तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा उदयोग करावा असा त्यांचा तरुणांना नेहमी सल्ला असतो .

इंदुरीकर महाराज सामाजिक कार्य : इंदुरीकर महाराज स्वखर्चाने एक शाळा देखील चालवता. त्यांच्या अशा समाजसेवेबदल ते कधीच कोणाला सांगत नाहीत. विद्यादानासारखे दुसरे कार्य नाही त्यातूनच उद्याचा उज्जवल देश घडेल म्हणुन ते शाळा चालवता व तेथे शिक्षकांचे काम देखील करतात. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय, ओझर बु येथे ही शाळा आहे .यात 210 विद्यार्धी शिक्षण घेत आहेत. यातील 85 विद्यार्धीनी पैकी अनेक अनाथ व निराधार आहेत . पंधरा वर्षांपासुन इंदुरीकर महाराज स्व:खर्चांने हि शाळा चालवत आहेत . शाळेत विज्ञान हा विषय ते ८ वी ९ च्या वर्गात शिकवता. शाळेतील ५ ते १० च्या शैक्षणीक खर्च ते स्वता करतात. भाकड गाईनसाठी ते गो शाळा चालवता . संगमनेर तालुक्यातील ओझर खु. पंचकृषीत बंद पडलेले हरि भक्त पारायणाचे सप्ते हि महाराज स्वखर्चांने करतात व पंचकृषीतील मंदिरारांचे रंगकाम , मंदिरातील मुर्ती हि इंदुरीकर महाराज स्वता देतात.

इंदुरीकर महाराजांच्या त्यांच्या कीर्तनातून राजकारणी , तरूण-तरुणी यांच्यावर चांगलीच टीका करता त्यामुळे ते लोकांना खुप आवडते. त्यांच्या कीर्तनाला होणारी गर्दी एखादया राजकीय नेत्याला लाजवेल अशा प्रकारची असते. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या PAGE ला LIKE करा .