साधारण दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने विकसित,विकसनशील आणि जागतिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये अक्षरशः हाहाकार मांडला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वात प्रथम लागण झालेला रुग्ण हा चीनमध्ये सापडला होता व चीनमधूनच या आजाराचे सुरुवात झाली असे मानले जाते. सध्या या आजारावर औषधोपचारांची कमतरता भासत आहे.अजूनही पूर्णपणे या आजारावर उपचार करणारी लस किंवा औषधोपचार विकसित झालेले नाहीत.
निरनिराळे देश कोरोना व्हायरससाठी लस विकसित करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरामध्ये दहा हजारच्या आसपास त्यांचा आकडा गेला आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा चीन आणि अमेरिका हे दोन जागतिक महासत्ता असणारे देश मात्र कोरोना व्हायरसची निर्मिती ही जागतिक विनाशाच्या उद्देशाने केली असल्याचा आरोप एकमेकांवर करताहेत. ज्याप्रमाणे आण्विक अस्त्र असतात अगदी त्याचप्रमाणे जैविक अस्त्राद्वारे सुद्धा अन्य देशांवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात संहार केला जाऊ शकतो .जागतिक स्तरावर चीन व अमेरिका सध्या कोरोना व्हायरसची निर्मिती करुन ती संपुर्ण जगभरामध्ये पसरवून जगभरात मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवून आणण्याचा आरोप केला जात आहे. मात्र या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे घटनाक्रमात द्वारे आपण जाणून घेणार आहोत.
सर्वात प्रथम कोरोना व्हायरसची माहिती मिळाली तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनाद्वारे कोरोना व्हायरस हा एखाद्या विषारी प्राण्या मार्फत सर्वत्र पसरला आहे असे निष्कर्ष काढण्यात आले होते व आज पर्यंत या निष्कर्षावर जागतिक आरोग्य संघटना ठाम आहे.
बोटाओ शिआओ आणि ली शिआओ या दोन चिनी संशोधकांनी कोरोना व्हायरस चीनमधील वुहान शहरातूनच सुरू झाल्याचा दावा केला आहे.
बोटाओ शिआओ आणि ली शिआओ यांनी असे सांगितले आहे की वुहानमधील सेंटर फोर डिसिज कंट्रोल च्या लॅबमध्ये कोरोना वायरसची लागण झालेल्या प्राण्यांचे शव तसेच पडलेले होते व त्याद्वारे कोरोना व्हायरस सर्वत्र पसरला गेला असण्याची शक्यता आहे.या लँबमध्ये 605 वटवाघुळे होते .कोरोना वायरस वटवाघुळ द्वारेच पसरला असल्याचे सर्वत्र सांगितले जात आहे.
अमेरिकन सरकारने देशामध्ये कोरोना व्हायरस पसरल्याचे लक्षात आल्यानंतर चीन सरकारने वेळीच उपाय न करता खबरदारीचे उपाय अवलंबण्यामध्ये खूप उशीर लावला व त्यामुळेच संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसचा फैलाव झाला असल्याचा आरोप केला होता यावर चार न सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेनेच कोरोना व्हायरसची निर्मिती करून आपल्या लष्कराद्वारे हे जैविक अस्त्र सोडल्याचा आरोप केला आहे.
३१ डिसेंबर २०१९ ला चीनने जागतिक आरोग्य संघटनेला न्युमोनिया सद्रश रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याचे कळवले.यांपैकी बहुतांश रुग्ण हे वुहानमधील मच्छीमार्केटमध्ये काम करणारे कर्मचारी होते.