एकट्याने प्रवास करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. याच गोष्टीसाठी आता आम्ही अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा प्रवास अगदी सोप्पा होऊन जाणार आहे. तर जाणून घेऊया या सर्व टिप्स बद्दल .
१. तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर तुमचे राहण्याचे ठिकाण आधीपासून योग्य पद्धतीने बुक करुन ठेवा. या हॉटेलचे फोटो आणि इतर गोष्टींची पूर्णपणे
माहिती करुन घ्या. होम स्टे असेल तर त्यांच्याशीही आधीपासून संपर्कात राहा.
२. प्रवासादरम्यान लोकांना भेटा, त्यांच्याशी ओळखीही करा पण तुमच्या राहण्याच्या ठिकाणाविषयी अनोळखी लोकांना सांगणे टाळाच.
३. तुमच्या प्रवासाशी निगडीत असणारी कागदपत्रे योग्य पद्धतीने, सुरक्षित ठिकाणी ठेवा. पासपोर्ट, तिकिटे यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो तुमच्या
फोनमध्ये आणि मेलवर सेव्ह करा. जेणेकरुन तुमची बॅग हरवलीच तर तुमच्याकडे प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे असतील.
४. ज्याठिकाणी कामासाठी किंवा फिरण्यासाठी जाल त्याठिकाणी तुम्ही एकट्या आल्या आहात असे समोरच्याला समजणार नाही असे वागा. यासाठी वेगळ्या
पद्धतीने आत्मविश्वासाने वागण्याची आवश्यकता आहे. हा आत्मविश्वास बाळगा.
५. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती साधने तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने स्प्रे, सेफ्टी अलार्म, एखादा लहान चाकू सोबत ठेवा. काही अडचण आल्यास
तात्काळ वापरण्यासाठी याचा उपयोग होतो.
६. तुम्ही प्रवासासाठी नेलेले पैसे एकाच ठिकाणी ठेऊ नका. ३ ते ४ वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवा. तसेच सामान्य जागांपेक्षा वेगळ्या जागांवर पैसे ठेवा.
याशिवाय आवश्यक असतील तेवढीच रोख रक्कम सोबत ठेवा.
७. तुम्ही ज्याठिकाणी जात आहात त्याठिकाणची जास्तीत जास्त माहिती करुन घेण्याचा प्रयत्न करा. भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक
परिस्थितीविषयी शक्य तितके जाणून घ्या. त्यामुळे तुमच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल