जागतिक स्तरावरील व्यापारामध्ये खनिजे ,रसायने, कातडीच्या वस्तू या व्यतिरिक्त फळे व भाजीपाला यांच्या आयात-निर्यातीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक व्यापारामध्ये आयात निर्यातीशी निगडित काही मापदंड काटेकोरपणे अमलात आणले जातात. जागतिक भाजीपाल्यांच्या व्यापारामध्ये त्या फळे व भाजीपाल्यांची गुणवत्ता, दर्जा ,मानांकन इत्यादीसाठी काही निकष बनवले जातात व या निकषांचे पालन करणारा मालच जागतिक स्तरावर व्यापारासाठी पाठवला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फळांवर एका विशिष्ट प्रकारचे स्टिकर चिकटवलेले आपण पाहतो. स्टिकर चिकटवण्याचा नक्की अर्थ काय असा प्रश्न नक्कीच पडू शकतात.

स्थानिक बाजारपेठेत खरेदी केलेल्या फळांपेक्षा किराणा दुकाने किंवा मॉल्समध्ये खरेदी केलेल्या फळांवर हे स्टिकर्स मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या स्टिकर्स वर पीएलयू कोड प्रिंट केलेला असतो.पीएलयू कोड म्हणजेच प्राईस लूक अप कोड होय.
पीएलयू कोड फळांच्या पोषक मूल्यां बद्दल आणि ते कसे निर्माण केले गेले आहे याबद्दल अगदी विस्तृत माहिती आपल्याला पुरवतात म्हणजेच आपण विकत घेत असलेले फळ हे सेंद्रिय पद्धतीने पिकवले गेले आहे कि कीटकनाशके आणि रासायनिक द्रव्यांचा मारा करून पिकवण्यात आले आहे याबद्दल माहिती देण्याबरोबरच संबंधित फळ हे त्या फळाचे अनुवंशिक गुणधर्मांमध्ये फेरफार करून निर्माण करण्यात आले आहे का इथपर्यंतची माहिती या स्टिकर्स चे नीट विश्लेषण केले तर आपल्याला मिळू शकते.
आय पी एफ एस ही आंतरराष्ट्रीय संघटना फळांसाठीचे पिएलयू कोड असलेले स्टिकर्स निर्माण आणि वितरित करते.
कोणत्याही फळावरील स्टिकर हे पाच अंकी असेल तर त्याची सुरुवात ही 9या अंकाने होत असेल तर याचा अर्थ असा होतो ते फळ सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात आले आहे व त्याचे कोणत्याही प्रकारे जैविक फेरफार केले। जाऊ शकत नाही.
फळावरील पीएलयू कोड हा पाच अंकी असेल व त्याची सुरुवात8ने होत असेल तर ती फळं ही सेंद्रिय पद्धतीने उगवलेली असतात .मात्र त्यांचे जैविक बदल केले जाऊ शकतात.
पीएलयू कोड मुळे आपल्याला कोणते फळ किंवा भाज्यांची खरेदी करू नये हेसुद्धा माहिती करून घेता येऊ शकते.म्हणजेच कोणत्या प्रकारची फळे व भाज्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे जाणून घेणे या स्टिकर्समुळे सहज शक्य होते.
ज्या फळे किंवा भाज्या वरील पिएलयू कोड हे चार अंकी असतात त्यांचा अर्थ असा होतो की या फळे किंवा भाज्या पारंपारिक पद्धतीने कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर करून पिकवल्या आहेत. ज्या भाज्या किंवा फळांवरील कोड चार अंकी व चार या अंकाने सुरू झालेला असतो याचा अर्थ असा होतो की संबंधित भाज्या आणि फळे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अक्षरशः मारा करून पिकवण्यात आलेली आहे .त्यामुळे शक्यतो ज्या भाज्या आणि फळांवर चार अंकी कोड असतो अशा भाज्या आणि फळे खरेदी करणे टाळावे.
ज्या फळे आणि भाज्या यांवरील स्टिकर पाच अंकी असतात व त्यांची सुरुवात ही 8 या अंकाने होते त्या फळे किंवा भाज्या सेंद्रिय पद्धतीने उगवलेल्या असतात मात्र त्यांच्यावर जैविक संशोधन करण्यात आलेले असते. अशा प्रकारच्या भाज्या व फळे ही चार अंकी कोड असलेल्या भाज्या आणि फळांपेक्षा खाण्यासाठी चांगल्या प्रतीच्या असतात.
ज्या भाज्या आणि फळांवर पाच अंकी कोड असतो व ज्याची सुरुवात 9या अंकाने होते त्या संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या असतात व। खाण्यासाठी अशा भाज्या आणि फळे उत्तम दर्जाची मानली जातात.