January 26, 2023

७५० रुपयांना चहा मिळणाऱ्या ताज हॉटेलमध्ये मिळते इतक्या रुपयांना थाळी

भारतीय संस्कृतीने जगाला खानपानाच्या अनेक प्रकारांची माहिती करून दिली आहे. भारतातील पर्यटनव्यवसाय जोम धरण्यामागे भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील खाद्यपदार्थांची रेलचेल हे प्रमुख कारण आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रांतामध्ये वैविध्यपूर्ण चवींची रेलचेल आहे. या कानाकोप-यातील चवींना एका रूचकर थाळीच्या रूपात विदेशी पर्यटकांसमोर पेश करण्याचे काम फाईव्ह स्टार हाॅटेल्स करतात.

भारतीय हाॅटेल व्यवसायात थाळी हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. हाॅटेलमधील जेवणाचे दर हे सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीपासून ते अगदी हजारोंच्या घरातही आहे. भारताची शान मानले गेलेल्या ताज हाॅटेलला विदेशी पर्यटकाची नेहमीच प्रथम पसंती असते.

सर्वसामान्य ग्राहक किंवा खवय्या मात्र ते आपल्याला परवडणार नाही या समजामध्येच असतो.तर आपण जाणून घेऊया ताज हाॅटेलमधील जेवणाचे दर नेमके आहेत तरी किती ताज उद्योगसमूहाच्या अंतर्गत येणारे हाॅटेल ताज हे देशाच्या प्रत्येक काॅस्मोपोलिटन शहरात आहे.

ताज हाॅटेलमध्ये सर्वसाधारण हाॅटेलप्रमाणे थाळीची प्रथा नाही. ताज किंवा अन्य कोणत्याही फाइव्ह स्टार हाॅटेलमध्ये जेवणाची निवड दोन प्रकारांनी केली जाऊ शकते. हाॅटेलच्या मेनू कार्डमधील पदार्थांमधून आपण निवड करू शकतो.

दूसरा पर्याय म्हणजे हाॅटेलमध्ये निरनिराळ्या पदार्थांना टेबलवर बुफेच्या स्वरूपात मांडलेले असते. आपण या दोन पर्यायांपैकी आपल्याला आवडेल व परवडेल अशा प्रकाराची निवड करू शकतो. मेट्रोपोलिटन शहरांमध्ये अशा बुफे सिस्टम जेवणाची किंमत प्रतिव्यक्ती २००० – ३००० असते तर छोट्या शहरांमध्ये हा दर १५००-२००० असतो.

ताज हाॅटेल हे ताज उद्योगसमूहाने संपूर्ण देशभरात उघडलेली पंचतारांकित हाॅटेल्सची साखळी आहे. १९०३ साली टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी ताज हाॅटेलची स्थापना केली.ताज हाॅटेलने आतापर्यंत जागतिक स्तरावरील अनेक नामांकित व्यक्तींचा पाहूणचार केला आहे.

ताज हाॅटेलमध्ये एकूण २८५ रूम्स आहेत व येथील जेवणाप्रमाणेच हाॅटेलचे बांधकाम, इंटेरिअरसुद्धा प्राचीन भारताच्या स्थापत्य व वास्तूशास्त्राचे दर्शन घडवतात. हाॅटेल ताजमध्ये केवळ भारतीयच नव्हे तर जपान, चायनीज व युरोपियन देशांमधील पदार्थही चाखायला मिळतात. संपूर्ण दिवसभर ताज मधील भोोजनव्यवस्था चालू असते.