आपले आरोग्य व शरीर ही खऱ्या अर्थाने आपली संपत्ती आहे असे मानले जाते .आपल्या शरीराची व आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराचे आरोग्य हे आपण जे खातो पितो त्यावर पूर्णपणे अवलंबून असते असे आयुर्वेदात सांगितले आहे. खाण्यापिण्या बरोबरच आपली दिनचर्या सुद्धा महत्वाची आहे. आपण काय खातो काय पितो या सोबत कधी खातो व कधी पितो यावर सुद्धा त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम अवलंबून आहे. आयुर्वेदानुसार आपल्या आहारातील काही पदार्थ हे शरीराला हितकारी असले तरीही त्यांचे सेवन दिवसा करणे व्यर्ज आहे तर काही अन्नपदार्थांचे सेवन हे रात्री शक्यतो टाळावे. आज आपण असेच काही अन्नघटक पाहणार आहोत त्यांचे सेवन करणे आपण शक्यतो रात्रीच्या आहारामध्ये टाळले गेले पाहिजे.
आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की रात्रीचा आहार हा शक्यतो हलका असावा. रात्रीच्या वेळी आपल्या शरीरातील कफ घटक कार्यरत असतो त्यामुळे त्याचे संतुलन करण्यासाठी जड अन्न टाळले गेले पाहिजे.
रात्रीच्या जेवणामध्ये अतिप्रमाणात कर्बोदकांच्या समावेश असलेले जड अन्न खाऊ नये. कर्बोदक युक्त असलेला आहार पचण्यासाठी पचनशक्तीवर अतिरिक्त ताण पडतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ताजेतवाने वाटत नाही म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो कर्बोदकांनीयुक्त पदार्थांचा वापर टाळावा.
१) रात्रीच्या वेळी जेवणामध्ये दह्याचा वापर टाळावा. दह्याऐवजी ताक रात्रीच्या आहारात सामाविष्ट केले तर काहीच हरकत नाही. दह्याच्या सेवनामुळे कफदोष वाढू शकतो म्हणून रात्रीच्या जेवणात दही समाविष्ट करु नये असे आयुर्वेदात सांगितले आहे.
आपण झोपेत असताना पचनसंस्था ही फारशी कार्यरत नसते. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रमाणातच आहार घेणे चांगले आहे. रात्रीच्यावेळी अन्नाचे पचन झाले नाही तर सकाळी पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
रात्रीच्या आहारात प्रथिनांनी युक्त असे पदार्थ मोठ्या प्रमाणात समाविष्ट करावे .हिरव्या पालेभाज्या,फळे इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात.प्रथिनांच्या वापरामुळे आपली पचनसंस्था सुरळीतपणे काम करते.
२) तुम्हांला जर झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सवय असेल तर गरम दुधाचा वापर शक्यतो करावा. झोपण्यापूर्वी कधीही थंड दूध पिऊ नये .दूध हे उकळून घेऊन मगच प्यावे. लो फॅट आणि उकळून घेतलेले दूध पचनासाठी सोपे असते.
३) भारतीय आहारामध्ये निरनिराळ्या गरम मसाला यांचा समावेश असतो.या मसाल्यांमुळे पचनशक्तीला ऊर्जा मिळवून ते अधिक वेगाने कार्य करतात. खूप जास्त मसाल्याचे पदार्थ रात्रीच्या वेळी खाऊ नये मात्र दालचिनी, लवंग ,मेथी यांसारख्या मसाल्यांच्या पदार्थांचा वापर केला तर ते फायदेशीर ठरू शकते.
४) मिठ अतिरिक्त खाण्यामुळे शरीरातील पाण्याचे चे प्रमाण वाढते व त्याच प्रमाणे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.म्हणूनच रात्री सात वाजेनंतर आपल्या शरीरामध्ये मीठाचा प्रवेश होऊ देऊ नये.
5) जेवणामध्ये कृत्रिम रीत्या बनवण्यात आलेला हवाबंद पदार्थांचा वापर टाळावा. रात्रीच्या जेवणामध्ये नैसर्गिक रित्या तयार केलेले ताजे व घरगुती जेवण घेण्यावर भर दिला जावा.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद . जय महाराष्ट्र #beingmaharashtrian