March 16, 2023

श्रीमंत व्हायचंय? मग ‘या’ आहेत खास टिप्स…

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होणे ही सर्वात मोठी महत्वकांक्षा असते. यशस्वी होण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात .मात्र यशस्वी होणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होतेच असा नाहीये. प्रत्येक व्यक्तीच्या यशस्वी होण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात काही व्यक्तींच्या मते आयुष्यामध्ये आपण जे काम करतो त्यामध्ये सुखी समाधानी असणे म्हणजे यशस्वी असणे तर काहींच्या मते श्रीमंत असणे म्हणजे यशस्वी होणे हा सर्वसाधारण समाज आपल्या समाजात रूढ आहे.

श्रीमंत असणे म्हणजे यशस्वी होणे या सर्वसाधारण समजामुळे काही व्यक्ती ह्या आयुष्यामध्ये  श्रीमंत का होत नाही यावर चर्चा रंगतात.ज्यांना आज संपूर्ण जगभरात यशस्वी मानले जाते अशा काही प्रेरणादायी व्यक्तींच्या कानमंत्राच्या आधारे हे विश्लेषण केले जाते. वॉरेन बफे हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज आणि जगातील अतिश्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले नाव आहे .वाँरन बुफे यांनी कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होणे व श्रीमंत होणे सहज शक्य आहे व त्यासाठी काही मंत्रांचा अवलंब करणे आवश्यक आहे असे सांगितले आहे.

वॉरन बफे यांनी कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवसायाशी निगडीत नफा-तोटा किंवा भांडवलाचे निगडित कोणत्याही गोष्टींचा संबंध नाही  असे सांगितले आहे हे आश्चर्यकारक आहे. वाँरन बफे यांनी यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये गुंतवणूक करणे खूप आवश्यक आहे असे सांगितले आहे.

उत्कृष्ट संवाद  कौशल्यःयशस्वी होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने उत्कृष्ट संभाषण व लिखित प्रकटीकरण स्वरूपात कौशल्य  प्राप्त करणे अत्यंत आवश्यक असते. उत्कृष्ट संभाषण कौशल्य असलेल्या व्यक्ती आपल्या कल्पना या समोरच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकतात व आपल्या कल्पना समोरच्यापर्यंत प्रभावीपणे पोचवण्याची कला ही वैयक्तिक आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असते.

स्वतःची काळजी घेणेः कोणत्याही व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी स्वतःची परिपूर्ण काळजी घेणे आवश्यक असते.कोणत्याही व्यक्तीने तरुण वयापासूनच स्वतःचे शरीर आणि मन या दोन्हींची काळजी घेणे आवश्यक असते.वयाच्या पन्नाशीला पोहोचल्यानंतर आपल्या तब्येतीची काळजी घेण्यापेक्षा अगदी तारुण्यावस्थेत आहार ,व्यायाम यांचा अंगीकार करावा हा कानमंत्र वाँरन बफे देतात.वाँरन बफे म्हणतात की जणू काही आपल्याकडे एकच कार आहे व तीच आयुष्यभर आपल्याला चालवायची आहे असे मानले तर आपण त्या एकाच कारची काळजी, त्याची देखभाल, व्यवस्थित  वेळेच्या वेळी करतो. त्या प्रमाणात आपल्याकडे संपूर्ण आयुष्यभरासाठी एकच शरीर असते त्यामुळे त्याची काळजी ही काटेकोरपणे घेतली गेली पाहिजे. यशस्वी होण्यासाठी आर्थिक गुंतवणुकी बरोबरच स्वतःच्या शरीर ,बलोपासना, बौद्धिक विकास यांच्या स्वरूपात ही गुंतवणूक केली गेली पाहिजे असा सल्ला वाँरन बफे देतात.

आपले ध्येय ओळखाःआपले ध्येय ओळखून त्यादृष्टीने एकाग्रचित्ताने प्रयत्न करणे यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते असे वाँरन बफे सांगतात. ते स्वतःला अत्यंत नशीबवान समजतात कि खूप लहान वयातच त्यांना स्वतःला कोणते ध्येय गाठायचे आहे हे समजले .त्यांच्या मते कधीही अगदी आपल्या पहिल्या कामाच्या ठिकाणीच आपल्याला आपले पँशन नक्की काय आहे ते कळू शकेल असे नाही  मात्र अशावेळी खचून न जाता सातत्याने आपले ध्येय संशोधन करायला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या आवडीचे काम करतो तेव्हा पूर्ण जिद्दीने करतो त्यामुळे सातत्याने आपल्या आवडीचे काम करावे.आपल्याला ज्या कामावर प्रेम आणि आदर आहे अशा कामाच्या शोध घेत राहणे कधीही थांबविले नाही पाहिजे.

यशस्वी व्यवसाय करण्यासाठी एकटी व्यक्ती पुरेसे योगदान देऊ शकत नाही त्यासाठी एका टीमची गरज असते म्हणूनच आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी प्रचंड इच्छाशक्ती व सकारात्मकता असणाऱ्या व्यक्तींना निवडणे आवश्यक आहे असे वाँरन बफे  सांगतात. महत्वकांक्षी व कामा प्रतीचा प्रामाणिकपणा असणारी टीम यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे हे त्यांचे मत आहे.

सामर्थ्य चक्रःप्रत्येक व्यक्तीमध्ये कुठलीतरी एक अशी क्षमता असते जे त्या व्यक्तीचे सामर्थ्य असते.आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीला यशस्वी व्हायचे असते ,आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये पुढे जायचे असते त्या व्यक्तीने आजूबाजूचे लोक किंवा समाज काय म्हणतात या गोष्टींचा विचार केला नाही पाहिजे .त्यांच्या मते ज्या व्यक्ती स्वतंत्र विचार करतात त्यांना आजूबाजूचे लोक नेहमी नकारात्मक  सल्ले देत असतात व त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करु नये. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांचे मत किंवा चालला विचारात घेते तेव्हा त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्या निर्णयांवर पडतो.मानवी स्वभावच असा आहे आपण इतरांकडून स्वीकारार्हता व मान्यता मिळवण्यासाठी धडपडत असतो मात्र या प्रक्रियेमध्ये इतरांचे विचार आपल्या यशस्वी होण्याच्या मार्गात अडथळा बनता कामा नये.

वाचनाची आवडः वाँरन बफे.स्वतः एक प्रचंड वाचनाची आवड असलेले व्यक्ती आहेत त्यामुळे यशस्वी होण्यासाठी नेहमी काहीना काहीतरी वाचण्याची सवय ही आपल्यामध्ये असावी असे वॉरन बफे सांगतात. ते एक अब्‍जाधीश असून सुद्धा आजही दिवसातील पाच ते सहा तास निरनिराळ्या विषयांवरचे वाचन करत असतात व सकाळी जवळपास पाच वर्तमानपत्रे वाचूनच त्यांचा दिवस सुरू होतो. केवळ वॉरन बफेच नव्हे तर ब-याच यशस्वी व्यक्ती या उत्कृष्ट वाचक आहेत. वाचनामुळे आपला दृष्टिकोन बदलतो व यशस्वी होण्यासाठी च्या निराळ्या शक्यतांवर विषयी आपण जागृत होतो. त्यामुळे केवळ आपल्याला वाचण्यासाठी वेळ नाही हे कारण न देता ते किमान पंधरा मिनिटे तरी वाचन करणे गरजेचे आहे असे वाँरन बफे सांगतात.

सुरक्षित अंतरःवॉरन बफे यांच्या मते आपण कोणतीही गुंतवणूक करताना एक सुरक्षित अंतर ठेवून मगच गुंतवणूक केली पाहिजे. वेगळेपणा जपणेःत्यांच्या मते आजच्या स्पर्धात्मक  युगामध्ये जिथे नित्य नवे स्पर्धक तयार होत आहेत अशा वातावरणात यशस्वी होण्यासाठी स्वतःचे बलस्थाने ओळखून स्वतःला वेगळेपणा जपणे खूप आवश्यक आहे.

वॉरन बफे यांचा २५/५ हा मंत्र खूपच प्रसिद्ध आहे. या मंत्राच्या पाच टप्प्यां विषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.

  • सर्वात प्रथम व्यक्तीने आपल्याला आपल्या करिअरमध्ये गाठावयाच्या सर्वात महत्वपूर्ण अशा पंचवीस ध्येयांना  प्राधान्य क्रमाने मांडावे.
  • यानंतर आपल्या मांडलेल्या 25 ध्येयांपैकीआपल्याला सगळ्यात महत्वपूर्ण वाटणाऱ्या पाच ध्येयांभोवती वर्तुळ करावे .या पाच ध्येयांना निश्चित  करताना पुन्हा पुन्हा या गोष्टीची चाचपणी करावी की खरोखरच ही पाच ध्येय अत्यावश्यक आहे का?
  • आयुष्यामध्ये यांच्या शिवाय जगूच शकत नाही  अशा 5 ध्येयांना आपण सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम प्राधान्यक्रम दिला आहे .या ध्येयांना  पूर्ण करण्यामध्ये आपली सर्व ऊर्जा व वेळ गुंतवणे आवश्यक असते.अशा वेळी हे पाच प्राधान्यक्रम पूर्ण करताना कोणत्याही परिस्थितीत अन्य राहिलेल्या प्राधान्य क्रमां कडे लक्ष  विचलित होऊ देऊ नये. हे 20 प्राधान्यक्रम तेव्हाच पूर्ण करण्यासाठी घ्यावे जेव्हा पहिले पाच प्राधान्यक्रम पूर्ण होतील .
  • बफे यांच्या 5 प्राधान्य क्रमांच्या मंत्र उपयोग आपण दैनंदिन आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अगदी सहज रीतीने करून घेऊ शकतो. म्हणजे जर दैनंदिन आयुष्यामध्ये तुम चे ध्येय फिट राहण्याचे असेल तर एका कागदावर आपल्या आरोग्य संबंधीचे पंचवीस प्राधान्यक्रम लिहून काढावे जसे की जंक फूड खाणे टाळणे ,लवकर उठणे ,लवकर झोपणे ,व्यायाम करणे, भरपूर पाणी पिणे इत्यादी व या 25 प्राधान्यक्रमात पैकी पाच प्राधान्य क्रमांना वर्तुळ करणे जे गाठणे हे तुमचे दैनंदिन सर्वोत्तम प्राधान्य असेल. अशाच प्रकारे वैयक्तिक आयुष्यातही कुटुंबासाठी वेळ देणे, कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाणे, घरी आल्यावर इलेक्ट्रॉनिक गोष्टी बाजूला ठेवणे ,इत्यादी सारख्या पंचवीस प्राधान्यक्रमांना कागदावर लिहून त्यापैकी पाच अत्यावश्यक प्राधान्यक्रमांना वर्तुळ करून ते पाच प्राधान्यक्रम पूर्ण करण्यावर भर दिला तर नक्कीच एक सुखी व समाधानी कौटुंबिक आयुष्य आपण जगू शकतो.