May 29, 2023

इंडिया चा क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदान्ना बद्द्ल ‘या’ ८ गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

टिक टॉक व्हिडिओज, मेमे किंवा पापाराझींचे राज्य सुरू होण्याअगोदर भारतीय चित्रपट सृष्टीतील आरस्पानी सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मधुबाला, चिरतारुण्याचे जिवंत उदाहरण रेखा, आपल्या हास्याने घायाळ करणाऱ्या माधुरी दीक्षित, सोज्वळ सौंदर्य असलेल्या स्मिता पाटील या सर्व अभिनेत्रींनी अथक मेहनतीच्या जोरावर ,अभिनयाच्या जोरावर आपले सौंदर्य आणि अभिनय या  दोन्हींची छबी प्रेक्षकांच्या हृदयावर उमटवली आहे जी कधीही पुसली जाऊ शकत नाही .सध्याच्या घडीला व्हायरल होणारे व्हिडीओज,फोटोज ,प्रसारमाध्यमांमधील चित्रपट अभिनेत्यांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक क्षण सातत्याने प्रेक्षकांसमोर आणण्याच्या ट्रेंड मुळे चर्चेत राहण्यासाठी बॉलिवुडमधील अभिनेत्यांना फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. सध्याच्या काळामध्ये नॅशनल क्रश ही संकल्पना अनेक नवोदित सुंदर अभिनेत्रींसाठी वापरली जाते व या अभिनेत्रींना इंटरनेटवर सर्च करण्यासाठी, त्यांच्याविषयीची माहिती मिळवण्यासाठी खूप सारे फॉलोवर्स ही असतात .अशाच एका कन्नडा क्रश म्हणून नावाजल्या गेलेल्या दाक्षिणात्य सौंदर्यवतीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत .या सौंदर्यवती चे नाव आहे दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाः

1) रश्मिका मंदान्ना हिचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकामधील विराज पेठ येथे झाला.

2) रश्मिका ने आपले प्राथमिक शिक्षण कूर्ग पब्लिक स्कूल येथून पूर्ण केले.  मानसशास्त्र,पत्रकारिता व इंग्लिश लिटरेचर हे प्रमुख विषय घेऊन तिने रमय्या स्कूल ऑफ आर्ट्स मधून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

3) रश्मिका ने शिक्षणाला कधीही दुय्यम स्थान दिले नाही .शिक्षण पूर्ण करत असताना आवड म्हणून तीने काही जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम केले व या जाहिरातींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

4) रश्मिका ने 2012 सारी आपल्या मॉडेलिंगच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली .तिला क्लीन अँड  क्लिअर फेस ऑफ इंडिया हे टायटल मिळाले .या स्पर्धेच्या दरम्यान तिचा नृत्य करताना चा फोटो पाहून किरिक पार्टी या सिनेमासाठी च्या प्रमुख भूमिकेसाठी तिची निवड झाली .अवघ्या 19व्या वर्षी तिने आपल्या पहिल्या सिनेमासाठी काम सुरू केले. या चित्रपटात तिने या सानवी जोसेफ मुलीची भूमिका केली असून रक्षित शेट्टी हा तिच्या प्रियकराच्या भूमिकेत होता.

5) रश्मिका च्या पहिला चित्रपट असलेल्या किरीक पार्टीने सर्व चाहते आणि समीक्षकांची लक्ष वेधून घेतले. टाइम्स ऑफ इंडिया, डेक्कन क्रोनिकल ,इंडियन एक्सप्रेस यांसारख्या मातब्बर वृत्तपत्रांमधील चित्रपट समीक्षकांनी रश्मिकाच्या कामाची प्रशंसा केली. हा चित्रपट कर्नाटकामधील चित्रपटगृहांमध्ये तब्बल दीडशे दिवस चालला.नवोदित अभिनेत्रीचे साठीचा पुरस्कारही रश्मिकाला मिळाला .रश्मिका ने कन्नड भाषेतील अंजनी पुत्र आणि चमक या दोन सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले. या चित्रपटांनाही प्रेक्षक व समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. अशाप्रकारे सलग तीन सुपरहिट चित्रपट देणारी कन्नड सिनेमातील ती एकमेव एक्ट्रेस बनली.

6) कन्नड भाषेतील सिनेमांमध्ये यशस्वी चित्रपटांची हॅट्रिक दिल्यानंतर रश्मिका ने आपला मोर्चा तेलगू भाषेकडे वळवला .याठिकाणी तिने चालो ,देवदास आणि गीत गोविंदम या सुपरहिट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या व तेलगु चित्रपटांमध्येही बिग बजेट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री व यशस्वी चित्रपटांची हँटट्रिक देणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.

7) रश्मिका ने तमिळ भाषेमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आणि महेश बाबू सोबत साईलारे निक्केवारू या चित्रपटामध्ये भूमिका केल्या .साईलारे निक्केवारू या चित्रपटाद्वारे तिला तिच्या आत्तापर्यंतच्या सगळ्यात जास्त नफा मिळवून देणाऱ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

8) कन्नड फिल्म इंडस्ट्री आणि प्रसार माध्यमांनी रश्मिका ला कन्नड क्रश असे नाव दिले आहे .तिच्या चाहत्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे .तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी नेहमीच उत्सुकता असते . रश्मिका आणि  किरिक पार्टी या पहिल्या चित्रपटातील सहकलाकार रक्षित शेट्टी हे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते व त्यांनी 2017 मध्ये एका कौटुंबिक सोहळ्यात वांड्.निश्चयही केला होता मात्र 2018 साली परस्पर सामंजस्याने ते विभक्त हि झाले.