
सैराट सिनेमातून प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हि सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिने आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले असून ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. सध्या तिने सोशल मीडियावर काही फोटो अपलोड केले असून यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

तिने नुकतेच सोशल मीडियावर साडीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवर तिने आपले फोटो अपलोड केले आहेत. सैराट या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. या फोटोंमध्ये तिने साडीबरोबर नथ देखील घातल्याने तिच्या सौंदर्यात भर पडत आहे. तिने यामध्ये टिकलीदेखील लावली आहे.


आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ती झुंड सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमात आकाश ठोसर देखील काम करणार आहे. पारंपरिक साडीबरोबरच तिचा वेस्टर्न पोशाखातील फोटो देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.