December 6, 2022

आपल्या सोज्वळ सौंदर्याने ‘या’ मराठी अभिनेत्रींने केले घायाळ, लवकरच अडकणार लग्नबेडीत

मराठी चित्रपटांतील बोल्ड अभिनेत्री म्हणुन ओळख असलेली नेहा पेंडसे सध्या मोठया प्रमाणावर चर्चेत आहे. ती सध्या एका प्रसिद्ध व्यावसायिकाला डेट करत आहे. तिने स्वतःने याबद्दल कबुली दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर दोघांच्या डेट करतानाचे फोटो शेयर केले आहे. त्यांनी साखरपुडा केल्याची चर्चा देखील सध्या मराठी चित्रपट श्रुष्टीत रंगत आहे.

अनेक मराठी अभिनेत्यासोबत नेहा पेंडसे हिचे नाव याआधी जोडले गेले आहे. पण प्रथमच तिने डेट करत असल्याचे स्पष्ट केले आहे. लवकर त्यांचा विवाह देखील होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शार्दुल सिंग बयास असे व्यावसायिकाचे नाव असून त्यानेही याबदल बोलण्यास नकार दिला आहे. ‘बिग बॉस, मे आय कम इन मॅडम’ अशा अनेक हिंदी मालिकांत देखील तिने काम केलेले आहे. त्यामुळे नेहा पेंडसे त्या व्यावसायिका सोबत विवाह करते का हे पाहणे महत्वाचे ठरेल.