December 6, 2022

…. म्हणून दीपिका आणि रणवीर यापुढे एकत्रित काम करणार नाही

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपे रणवीर आणि दीपिका यांचे खूप चाहते आहेत. बॉलिवुडमध्ये देखील या जोडप्याने एकत्रित अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर देखील या दोघांचे अनेक फोटो येत असतात.

या दोघांनी आतापर्यंत तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केले असून चाहत्यांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे. दोघांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले असून त्यांनी एकत्रित हा आनंद साजरा केला. मात्र यापुढे चाहत्यांना हे दोघे सिनेमात एकत्र दिसणार नाहीत. दीपिकाने भविष्यात रणवीरसोबत चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.

dipika and ranvir
dipika and ranvir

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, सलग तीन सिनेमांमध्ये ती रणवीरसह काम करणार नाही. याचे स्पष्टीकरण देखील दिले असून याविषयी तिने सांगितले कि, रिअल लाइफमधली माझी आणि रणवीरमधील केमेस्ट्री मला सिनेमातून एक्सपोज करायची नाही. त्यामुळे आम्ही एकत्र सलग तीन सिनेमांमध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

याआधी दीपिका आणि रणवीर यांनी ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, बाजीराव ‘मस्‍तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे दोघांनी प्रेक्षकांना खूप चांगले क्षण दिले असून त्यांचा रोमान्स प्रेक्षकांना देखील आवडतो.

dipika and ranvir
dipika and ranvir

दरम्यान, दोघे लवकरच कपिल देव यांच्या जीवनावर येणाऱ्या 83 या सिनेमात दिसणार असून दीपिका यामध्ये पत्नीची भूमिका करणार आहे. त्यामुळे या दोघांचा हा एकत्र शेवटचा चित्रपट आहे कि काय ? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.