December 6, 2022

रामायणात रावण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल काही रोचक तथ्य काय आहेत?

भारतीय मनोरंजन विश्वामध्ये चित्रपट क्षेत्राप्रमाणेच टेलिव्हिजन क्षेत्राचेही रसिकांचे मनोरंजन करण्यात मोठे योगदान आहे .सुरुवातीच्या काळात भारतीय टेलिव्हिजनवर माहितीपर, ज्ञान-विज्ञान आधारित ,विनोदी ,रहस्यमय कथानकांप्रमाणेच पौराणिक कथा व चरित्रांवर आधारित कार्यक्रम दाखवले जात असत. मनोरंजनाची मर्यादित साधने असण्याच्या काळामध्ये छोट्या पडद्यावरील या कार्यक्रमांवर आजही प्रेक्षकांचे तितकेच प्रेम आहे. त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर देवी-देवतांशी निगडित कार्यक्रमांना प्रेक्षकांची पसंती होती व त्या अनुषंगानेच असे कार्यक्रम साप्ताहिक स्वरूपात दाखवले जात असत. या कार्यक्रमांच्या प्रसारणाच्या वेळी अक्षरशः सर्व कामे सोडून लोक टीव्ही समोर ठिय्या मांडून बसत.प्रत्यक्ष आयुष्यातही सीरियल्समधील कलाकारांना देवत्वाची जागा दिली जात असे व तेथे जात असत तिथे त्यांना खरोखरीचे देव समजून लोक त्यांच्या चरणी लीन होत असत.अशाच काही  सिरीयल पैकी एक म्हणजे रामायण होय.

रामायणामधील भगवान श्रीराम,लक्ष्मण, सीता, भरत या पात्रांप्रमाणेच रावणाची प्रमुख भूमिका केलेल्या अभिनेत्यालादेखील अमाप प्रसिद्धी मिळाली. ही प्रसिद्धी इतकी होती की त्यांना प्रत्यक्ष आयुष्यातही लोक रावण म्हणून हाक मारत व त्यांच्या पत्नीला मंदोदरी म्हणून ओळखत असत.रामायणामध्ये लंकाधिपती रावण ही भूमिका केलेल्या अरविंद त्रिवेदी या अभिनेत्या बद्दल आज आपण.काही गोष्टी जाणून घेऊयात

1. अरविंद त्रिवेदी हे रामायण या मालिकेच्या ऑडिशन च्यावेळी केवटाच्या भूमिकेची ऑडिशन देण्यासाठी गेले होते मात्र त्यांचे व्यक्तिमत्व व संवादफेक पाहून रामानंद सागर यांनी यांनी त्यांना लंकाधिपती रावणाची भूमिका देऊ केली.

2. अरविंद त्रिवेदी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1937रोजी मध्यप्रदेशातील इंदोर येथे झाला.

3. रामायण सिरीयल मध्ये रामाशी राम सोबत युद्ध करणारा व सीतेचे हरण करणारा रावण आपल्या अभिनयाद्वारे जिवंत करणारे अरविंद त्रिवेदी हे प्रत्यक्ष आयुष्यात मात्र रामाचे निस्सिम भक्त आहेत.

4. अरविंद त्रिवेदी यांचे मोठे भाऊ उपेंद्र त्रिवेदी हेसुद्धा गुजराती चित्रपटांमध्ये एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात.
5. अरविंद त्रिवेदी यांनी रामायणाप्रमाणे बिक्रम और बेताल यांसारख्या सिरीयल मध्ये काम केले आहे.

6. टीव्ही सिरीयल प्रमाणे गुजराती आणि हिंदी मधील जवळपास 250 चित्रपटांमध्ये त्यांनी निरनिराळ्या भूमिका निभावल्या आहेत.
7. अरविंद त्रिवेदी यांनी हिंदी चित्रपटांमधील जंगल मे मंगल, पराया धन या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहे.

8. अरविंद त्रिवेदी हे अभिनयक्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. 1991 साली गुजरात मधील साबरकांठा जिल्हयामधून त्यांची नियुक्ती संसदेवर झाली.
9. 2002 साली अरविंद त्रिवेदी यांची नियुक्ती भारतीय फिल्म प्रमाणन बोर्ड च्या अध्यक्षपदी झाली.